कोल्हापूर :
केएसएचे वीर पाटील, वेदांत माळी, आराध्य चौगले व रूद्र स्वामी यांची महाराष्ट्र राज्य सब-ज्युनियर बॉईज फुटबॉल संघात निवड झाली आहे.
ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनच्या वतीने सब-ज्युनियर बॉईज राष्ट्रीय फुटबॉल चॅम्पियनशीप २०२५-२६ पंजाब येथील अमृतसर येथे २७ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य संघ मुंबई येथून रवाना होणार आहे. वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन च्यावतीने मुंबई कुपरेज येथे गेली १५ दिवस सुरू असलेल्या निवड चाचणी व प्रशिक्षण शिबीरातून महाराष्ट्र राज्य सब-ज्युनियर बॉईज फुटबॉल संघासाठी खेळाडूंची नांवे नुकतीच जाहीर करण्यात आली. यामध्ये केएसएच्यावतीने पाठविण्यात आलेल्या पाच मुलांपैकी वीर संदीप पाटील (संजीवनी पब्लिक स्कूल), वेदांत अर्जुन माळी (संजीवनी पब्लिक स्कूल), आराध्य नागेश चौगले (महाराष्ट्र हायस्कूल) व रूद्र मकरंद स्वामी (सेंट झेवियर्स स्कूल) यांची निवड झालेली आहे.
के.एस.ए. फुटबॉल समितीच्या मार्गदर्शनानुसाार प्रशिक्षक प्रदीप साळोखे, निखिल कदम, संतोष पोवार, शरद मेढे व अनिल अडसुळे यांनी निवड चाचणीचे कामकाज पाहून या खेळाडूंची निवड केलेली होती. वीर, वेदांत, आराध्य व रूद्र हे खेळाडू पंजाब येथील अमृतसरमध्ये राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत महाराष्ट्र राज्य संघातून राज्याचे व कोल्हापूरचे प्रतिनिधीत्व करणार आहेत.
वीर, वेदांत, आराध्य, रूद्र या खेळाडूंना केएसए संस्थेचे पेट्रन-इन्-चीफ् खासदार श्री शाहू छत्रपती महाराज, पेट्रन् मेंबर श्री संभाजीराजे छत्रपती, ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनचे कार्यकारिणी सदस्य, वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष व केएसएचे अध्यक्ष श्री मालोजीराजे छत्रपती आणि ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन महिला समिती सदस्या, विफा फुटबॉल महिला समिती चेअरमन सौ. मधुरिमाराजे छत्रपती यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले. तसेच केएसएचे ऑन. जनरल सेक्रेटरी माणिक मंडलिक, ऑन. जॉईंट जनरल सेक्रेटरी अमर सासने व फुटबॉल सेक्रेटरी राजेंद्र दळवी यांचेही सहकार्य व प्रोत्साहन लाभले आहे.
——————————————————-
वीर, वेदांत, आराध्य व रूद्र यांची राज्य सब-ज्युनियर बॉईज फुटबॉल संघात निवड
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
30
°
C
30
°
29.9
°
45 %
3.1kmh
0 %
Sun
29
°
Mon
28
°
Tue
29
°
Wed
29
°
Thu
28
°

