• डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठात ‘जागतिक अन्न दिन’ उत्साहात
कोल्हापूर :
अन्न पदार्थाची गुणवत्ता वाढविण्यासोबत कौशल्यवृद्धीवर विशेष भर देणे आवश्यक आहे. पौष्टिक आणि गुणवत्तापूर्ण अन्न पदार्थांचे उत्पादन करण्यासाठी तरुण उद्योजकांनी पुढे येणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ऐविज फूड प्रा. लि., सांगलीचे कार्यकारी संचालक डॉ. महेश पाटील यांनी केले.
डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाच्या अन्न तंत्रज्ञान विभागातर्फे आयोजित ‘जागतिक अन्न दिन’ निमित्त एकदिवसीय कार्यशाळा व अन्न पदार्थ सादरीकरण स्पर्धेचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. महेश पाटील बोलत होते.
या वर्षीच्या जागतिक अन्न दिनाचा विषय ‘हॅन्ड इन हॅन्ड फॉर बेटर फूड अँड बेटर फु्चर’ हा होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. विक्रमसिंह इंगळे यांनी केले. यामध्ये त्यांनी आजच्या कार्यक्रमाचा उद्देश आणि महत्व विषद केले. प्रभारी कुलगुरू डॉ. सतीश पावसकर, कुलसचिव डॉ. जयेंद्र खोत यांचेही मार्गदर्शन लाभले.
अन्न पदार्थ सादरीकरण स्पर्धेत अन्न तंत्रज्ञान विभागातील तृतीय वर्षाचे विद्यार्थी श्रावणी शिंदे, नेहा बामणे, प्रशांत राऊत यांना प्रथम तर, श्रेया हलदर, अथर्व कल्याणकर व श्रावणी गौरीमठ यांना द्वितीय तसेच अण्णासाहेब डांगे अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी मानसी पाटील व ओंकार बाचल यांना तृतीय क्रमांक मिळाला. या स्पर्धेमध्ये एकूण १२० विद्यार्थांनी सहभाग घेतला होता. सहभागी सर्व विद्यार्थांना प्रशास्तिपत्रक देऊन गौरविण्यात आले. परीक्षक म्हणून डॉ. सागर चव्हाण व इं. प्रवीण उके यांनी काम पहिले. स्पर्धेचे नियोजन सहाय्यक प्राध्यापक डॉ. स्वप्नाली भोळे आणि डॉ. नमिता पाटील यांनी केले.
कार्यक्रमास डीन (अभियांत्रिकी) प्रा. डॉ. संग्राम पाटील, डीन (वाणिज्य व व्यवस्थापन) प्रा. डॉ. मुरली भूपती, डीन (रिसीर्च) डॉ. शिवानंद शिरकोळे, परीक्षा नियंत्रक डॉ. गुरुनाथ मोटे, असोसिएट डीन (अन्न तंत्रज्ञान) डॉ. विक्रमसिंह इंगळे,
असोसिएट डीन (व्यवस्थापन) प्रा. डॉ. अनिल गायकवाड, विभाग प्रमुख (रसायनशास्त्र) डॉ. तानाजी भोसले तसेच इतर प्राध्यापक व कर्मचारी आदी उपस्थित होते. सूत्रसंचलन प्रा.स्नेहल खांडेकर यांनी केले तर आभार डॉ. गुरुनाथ मोटे यांनी मानले.
कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांनी यशस्वी आयोजनाबद्दल सर्वांचे अभिनंदन केले.
——————————————————-
अन्न पदार्थाची गुणवत्ता आणि कौशल्यवृद्धीवर भर आवश्यक : डॉ. महेश पाटील
RELATED ARTICLES
Mumbai
mist
26
°
C
26
°
26
°
94 %
0kmh
40 %
Tue
27
°
Wed
27
°
Thu
27
°
Fri
28
°
Sat
28
°

