कोल्हापूर :
रॉयल रायडर्स क्लब कोल्हापूरचे माजी अध्यक्ष आणि संचालक जयदीप पवार यांनी रॉयल एन्फिल्ड कंपनीकडून क्लासिक ५०० क्रोम या गाडीचे स्केल मॉडेल घेतले आहे. या रॉयल इनफिल्ड बुलेटच्या हुबेहूब स्केल मॉडेलचे अनावरण श्री. मालोजीराजे छत्रपती यांच्या हस्ते झाले.
रॉयल रायडर्स हा कोल्हापूर, सांगली, इचलकरंजी, जयसिंगपूर परिसरातील बुलेट चालविणाऱ्या रायडर्सचा अग्रगण्य क्लब आहे. या क्लबचे माजी अध्यक्ष आणि संचालक जयदीप पवार यांनी रॉयल इनफिल्ड कंपनीकडून क्लासिक ५०० क्रोम या गाडीचे स्केल मॉडल घेतले आहे. संपूर्ण जगात १००० तर भारतात फक्त १५० गाड्या कंपनीने दिलेल्या आहेत. अत्यंत मर्यादित लोकांसाठी तयार केलेल्या या मॉडेलचे अनावरण श्रीमंत मालोजीराजे छत्रपती यांच्या हस्ते मोटर इंडिया शोरूम, अयोध्या पार्क येथे गुरुवारी दुपारी मोठ्या उत्साहात झाले.
रॉयल इनफिल्ड कंपनी दररोज आपल्या फॅक्टरीमध्ये ३५०० गाड्या तयार करते. पण हे एक छोटे स्केल मॉडेल तयार करण्यासाठी ४ दिवस लागतात. इतके अचूक काम यामध्ये केले जाते, अशी माहिती मोटर इंडिया शोरूमचे मालक रत्नाकर बांदिवडेकर यांनी दिली.
या अनावरण कार्यक्रमाला जयदीप पवार, समीर चौगुले, रत्नाकर बांदिवडेकर, अभिजीत काशिद यांच्यासह रॉयल रायडर्स कोल्हापूर क्लबचे पदाधिकारी, संचालक आणि सदस्य उपस्थित होते.
रॉयल इनफिल्ड बुलेटच्या हुबेहूब स्केल मॉडेलचे अनावरण
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
30
°
C
30
°
27.9
°
42 %
3.1kmh
20 %
Thu
28
°
Fri
26
°
Sat
25
°
Sun
26
°
Mon
27
°

