• टोल प्लाझांवरील लांबच लांब रांगा होणार इतिहासजमा
कोल्हापूर :
जिओ पेमेंट्स बँकेला फास्टॅग ऑटोमॅटिक नंबर प्लेट रिकग्निशनवर आधारित मल्टी-लेन फ्री फ्लो (MLFF) टोल कलेक्शन प्रणाली राबविण्यासाठी दोन टोल प्लाझांचे कंत्राट मिळाले आहे. जिओ पेमेंट्स बँक ही जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडची सहाय्यक आणि डिजिटल-फर्स्ट पेमेंट्स बँक आहे. गुरुग्राम-जयपूर महामार्गावरील शाहजहांपूर आणि मनोहरपुरा येथील टोल प्लाझांचे व्यवस्थापन जिओ पेमेंट्स बँककडे सोपविण्यात आले आहे. मल्टी-लेन फ्री फ्लो टोलिंग प्रणाली ही अशी पद्धत आहे, ज्यात वाहनांची ओळख पटवून त्यांचे वर्गीकरण करून टोल आकारला जातो.
या नव्या प्रणालीमुळे टोल प्लाझावर वाहनांना थांबावे, वेग कमी करावा किंवा ठराविक लेनमध्ये जावे लागणार नाही. वाहनांवरील टोल आकारणीसाठी रेडिओ फ्रीक्वेन्सी आयडेंटिफिकेशन (RFID), ऑटोमॅटिक नंबर प्लेट रिकग्निशन (ANPR), डेडिकेटेड शॉर्ट रेंज कम्युनिकेशन (DSRC) आणि ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टम (GNSS) यांसारख्या तंत्रज्ञानांचा वापर केला जातो. या प्रणालीमुळे टोल प्लाझांवरील वाहतूक सुरळीत आणि अखंड राहील.
जिओ पेमेंट्स बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विनोद ईश्वरन म्हणाले, आमचे ध्येय प्रत्येक पेमेंटला डिजिटल बनविणे, पायाभूत सुविधा देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचविणे आणि नागरिकांना अधिक चांगल्या आर्थिक सेवा पुरविणे आहे. आम्ही मोबिलिटी क्षेत्रातील आमची क्षमता सातत्याने वाढवत आहोत, जेणेकरून टोल वसुली अधिक कार्यक्षमतेने होऊ शकेल.
या दोन्ही प्लाझांचे कंत्राट भारतीय महामार्ग व्यवस्थापन कंपनी लिमिटेड (IHMCL) यांच्या टेंडरअंतर्गत देण्यात आले आहे. जिओ पेमेंट्स बँक सध्या देशभरातील ११ टोल प्लाझांचे व्यवस्थापन करत आहे. दोन नवीन प्रकल्पांच्या मिळकतीनंतर, जिओ पेमेंट्स बँक देशाच्या पायाभूत विकासात एक महत्त्वाची भूमिका बजावण्यासाठी सज्ज झाली आहे. या कार्यात जिओ प्लॅटफॉर्म्सच्या डिजिटल कौशल्याचा लाभ तिला मिळणार आहे.
जिओ पेमेंट्स बँक करणार ‘ॲडव्हान्स इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन’चा वापर
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
28
°
C
28
°
28
°
47 %
0kmh
20 %
Thu
27
°
Fri
26
°
Sat
25
°
Sun
26
°
Mon
27
°

