• डी. वाय. पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठात ड्रोन फवारणी प्रात्यक्षिक
कोल्हापूर :
ड्रोन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतीला नवे बळ मिळत आहे. ड्रोनच्या साहाय्याने शेतकरी पीक व्यवस्थापन, सिंचन नियंत्रण आणि पीक नुकसान मूल्यांकन यासारखी कामे अधिक अचूक व जलद पद्धतीने करू शकतात. त्यामुळे विकसित शेतीसाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे आवाहन डी. वाय. पाटील कृषी व तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सतीश पावसकर यांनी केले. यावेळी ‘सलाम किसान’ कंपनीचे प्रादेशिक मानव संसाधन विभाग प्रमुख साद मुलाणी यांची उपस्थिती होती.
विद्यापीठाच्या कृषी अभियांत्रिकी विभागाच्यावतीने ‘ड्रोन फवारणी प्रात्यक्षिक व तंत्रज्ञान कार्यशाळा’ उत्साहात पार पडली. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना ड्रोनच्या माध्यमातून कीटकनाशक फवारणीचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. ड्रोन तंत्रज्ञानाचे शेतीतील महत्त्व, त्याचे फायदे, ड्रोन उद्योगातील वाढत्या करिअर संधींविषयी साद मुलाणी यांनी सविस्तर माहिती दिली. मुलाणी म्हणाले की, या तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांचा वेळ, श्रम आणि खर्च वाचतो, तसेच पीक उत्पादन वाढविण्यास मोठी मदत होते.
डॉ. पावसकर म्हणाले, कृषी क्षेत्रात प्रिसिजन फार्मिंग, ऑटोमेशन आणि ड्रोन तंत्रज्ञान फार महत्वाचे आहे. विद्यार्थ्यांनी पारंपरिक ज्ञानाला नव्या तंत्रज्ञानाची जोड देऊन शाश्वत शेतीच्या दिशेने वाटचाल करावी, तसेच या क्षेत्राकडे विद्यार्थ्यांनी त्यांच्या करिअरसाठी सर्वोत्तम संधी म्हणून पहावे.
कृषी अभियांत्रिकी विभागाच्या सहयोगी अधिष्ठाता डॉ. मंगल पाटील यांनी प्रास्ताविकामध्ये विद्यार्थ्यांना शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारण्याचे महत्त्व सांगितले.
कार्यशाळेत ‘ड्रोन इंडस्ट्रीतील करिअर संधी’, ‘प्रिसिजन फार्मिंग आणि आयसीटी सेन्सर्सची भूमिका’, ‘फार्म मशीनेरीतील नवकल्पना’ आणि ‘अचूक यंत्रसामग्रीचे परीक्षण व मानकीकरणाचे महत्त्व’ या विषयांवर डॉ. अमोल घाडगे, डॉ. अमोल गोरे आणि डॉ. बाबासाहेब घोलप यांनी मार्गदर्शन केले.
यासाठी कुलपती डॉ. संजय डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, कुलसचिव डॉ. जयेंद्र खोत, अधिष्ठाता डॉ. संग्राम पाटील, वित्त अधिकारी सुजित सरनाईक यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.
——————————————————-
ड्रोन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतीला नवे बळ : डॉ. पावसकर
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
27
°
C
27
°
25.9
°
41 %
4.1kmh
20 %
Sun
28
°
Mon
28
°
Tue
29
°
Wed
29
°
Thu
28
°

