कोल्हापूर :
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक आणि सिद्धगिरी नर्सिंग इन्स्टिट्यूट, कणेरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय आंतर विभागीय निवड चाचणी क्रीडा स्पर्धा २०२५ या स्पर्धा उत्साहात पार पडल्या.
कणेरी (ता.करवीर) येथील सिद्धगिरी मठाच्या परिसरात या स्पर्धेचे उदघाटन श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थान मठाचे ४९वे मठाधिपती श्री काडसिद्धेश्वर स्वामीजी आणि राज्याचे आरोग्य मंत्री व कोल्हापूर जिल्हा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून क्रीडा महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी डॉ. देवेंद्र पाटील, राजकुमार पाटील, एम. डी. पाटील, विजय सनगर, यशोवर्धन बारामतीकर, गुंडोपंत वड, विवेक शेट्ये, निशांत पाटील, विविध वैद्यकीय आणि नर्सिंग महाविद्यालयांचे शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि क्रीडाशिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दोन दिवस चाललेल्या या क्रीडा स्पर्धांमध्ये ॲथलेटिक्स, खो-खो, कबड्डी, भालाफेक, उंच उडी अशा विविध प्रकारांचा समावेश होता. महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, नागपूर अशा अनेक जिल्ह्यातील वैद्यकीय व नर्सिंग संस्थांमधील विद्यार्थी या स्पर्धेमध्ये सहभागी होते.
या सोहळ्याचे सूत्रसंचालन विवेक सिद्ध यांनी केले. आभार डॉ. वर्षा पाटील यांनी मानले.
राज्यस्तरीय आंतर विभागीय निवड चाचणी क्रीडा स्पर्धा उत्साहात
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
31
°
C
31
°
28.9
°
42 %
4.6kmh
5 %
Thu
29
°
Fri
26
°
Sat
25
°
Sun
26
°
Mon
27
°

