Homeशैक्षणिक - उद्योग एचडीएफसी बँकेतर्फे ‘माय बिझनेस क्युआर’ची सुरुवात

एचडीएफसी बँकेतर्फे ‘माय बिझनेस क्युआर’ची सुरुवात

कोल्हापूर :
एचडीएफसी बँक या भारतातील आघाडीच्या खाजगी क्षेत्रातील बँकेतर्फे त्यांच्या माय बिझनेस क्युआरची सुरुवात करत असल्याची घोषणा ग्लोबल फिनटेक फेस्ट २०२५ मध्ये केली.
माय बिझनेस क्युआर हा छोट्या व्यावसायिकांसाठी विशेष असा भारतातील पहिला कॉमर्स आयडेंटिटी क्युआर आहे. या क्युआरची सुरुवात ही बँकेच्या स्मार्ट हब व्यापार या प्रसिध्द ॲपची पुढची पायरी म्हणून व्यापारीफायच्या सहकार्याने करण्यात आली. स्मार्टहब व्यापारचे आधी पासूनच देशभरांतील २ दशलक्षांहून अधिक व्यापारी वापर करत आहेत.
या अनोख्या क्युआरचा उपयोग भारतातील दोन डिजिटल सवयींच्या वापरातून होत आहे. जसे क्युआर पेमेंट आणि चॅट, यामुळे आता सोपा एंगेजमेंटवर आधारीत खरेदीचा अनोखा अनुभव प्राप्त होतो. माय बिझनेस क्युआरमुळे व्यापारी आता त्यांचे डिजिटल प्रोफाईल तयार करुन त्यांच्या स्टोअर फ्रंटला दुप्पट क्षमतेचे प्रोफाईल बनवू शकतील. यामुळे ग्राहक आता स्कॅन करुन त्या व्यापार्‍याचे प्रोफाईल त्यांच्या फोन मध्ये थेट सेव्ह करु शकतील. ‘माय बिझनेस क्युआर’ मुळे व्यापारी आता अधिक प्रमाणात सर्च इंजिन ऑप्टिमाईज्ड लिस्टींग्ज मिळवून ग्राहकांना सुध्दा थेट ऑर्डर करुन उत्पादने आणि सेवांसाठी लगेच पेमेंट अतिशय सुरक्षित पध्दतीने करणे शक्य होणार आहे.
याविषयी बोलतांना एचडीएफसी बँकेच्या पेमेंट्स आणि डायरेक्ट बँकिंग चॅनल्सचे प्रमुख रजनीश प्रभू यांनी सांगितले की, एचडीएफसी बँके मध्ये आम्ही नेहमीच प्रत्येक व्यापार्‍याला तंत्रज्ञानाने सक्षम करुन त्यांच्या व्यवसायाची वाढ करत ग्राहकांचा विश्वास संपादन करण्यास सक्षम करत असतो. आमच्या स्मार्टहब व्यापार ॲप मुळे आम्ही डिजिटल पेमेंट्स व्यापार्‍यांसाठी सोपे करण्या बरोबरच आता माय बिझनेस क्युआरमुळे त्यांना डिजिटल अर्थव्यवस्थेत त्यांचा व्यापार वाढवण्यास मदत करत आहोत. जीएफएफ मधील ही सुरुवात आमच्या छोट्या व्यापार्‍यांना सोप्या आणि सर्वसमावेशक तंत्रज्ञानाच्या उपायांचा वापर करण्याच्या आमच्या वचनबध्दतेला अधोरेखित करते.

RELATED ARTICLES
Mumbai
haze
28 ° C
28 °
28 °
78 %
2.1kmh
20 %
Thu
32 °
Fri
28 °
Sat
27 °
Sun
28 °
Mon
29 °

Most Popular

You cannot copy content of this page