कोल्हापूर :
सन २०२५-२६च्या फुटबॉल हंगामासाठी कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशन (केएसए) कडे फुटबॉल संघ व खेळाडू नोंदणी प्रक्रिया गुरुवारी पूर्ण झाली. ए डिव्हिजन (वरिष्ठ गट) मधील १६ संघांतून एकूण ३१९ खेळाडूंची नोंदणी झाली आहे. १५ संघांमध्ये प्रत्येकी २० खेळाडूंची नोंदणी पूर्ण झालेली आहे. सुभाषनगर फुटबॉल क्लब संघामध्ये १९ खेळाडूंची नोंदणी झालेली आहे.
केएसए ए डिव्हिजन अंतर्गत संघ व खेळाडू नोंदणी पूर्ण झाली. यामध्ये पाटाकडील तालीम मंडळ (अ), खंडोबा तालीम मंडळ, श्री शिवाजी तरूण मंडळ, संयुक्त जुना बुधवार पेठ, दिलबहार तालीम मंडळ, बालगोपाल तालीम मंडळ, वेताळमाळ तालीम मंडळ, सम्राटनगर स्पोर्ट्स, संध्यामठ तरूण मंडळ, झुंजार क्लब, फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ, पाटाकडील तालीम मंडळ (ब), उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळ, प्रॅक्टीस फुटबॉल क्लब, रंकाळा तालीम मंडळ या १५
संघांमध्ये प्रत्येकी २० खेळाडूंची नोंदणी पूर्ण झालेली आहे. सुभाषनगर फुटबॉल क्लब संघामध्ये १९ खेळाडूंची नोंदणी झालेली आहे.
ए डिव्हिजन (वरिष्ठ गट) मधील १६ संघांतून ३१९ खेळाडूंची नोंदणी झाली. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याबाहेरील एकूण ४२ खेळाडूंची नोंदणी झालेली आहे. त्यामध्ये नवीन ३३ व जुने ९ खेळाडूंची नोंदणी झालेली आहे.
१६ संघांतून ३१९ खेळाडूंची नोंदणी
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
31
°
C
31
°
30.9
°
33 %
4.1kmh
20 %
Sun
30
°
Mon
28
°
Tue
29
°
Wed
29
°
Thu
28
°

