• डी. वाय. पाटील विद्यापीठाचे संशोधन, एआय तंत्रज्ञानाचा वापर
कोल्हापूर :
विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या संगमातून आरोग्य क्षेत्रात नवी क्रांती घडवून आणणारे संशोधन डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या संशोधकांनी केले आहे. या संशोधकांनी महिलांमधील अंडाशयाचा कर्करोग प्रारंभिक टप्प्यातच ओळखण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित ‘स्मार्ट बझर’ नावाचे अभिनव उपकरण विकसित केले असून, हे संशोधन महिलांच्या आरोग्यासाठी वरदान ठरणार आहे.
विद्यापीठाच्या सेंटर फॉर इंटर डीसीप्लेनरी स्टडीजच्या स्टेम सेल आणि रिजनरेटिव्ह मेडिसिन तसेच मेडिकल बायोटेक्नॉलॉजी विभागातील प्रा. अर्पिता पांडे – तिवारी यांच्या नेतृत्वाखाली संशोधक विद्यार्थी प्रणोती कांबळे आणि सोहेल शेख यांनी उपकरण तयार केले आहे. त्यांना रिसर्च डायरेक्टर प्रा. डॉ. सी. डी. लोखंडे यांचे मार्गदर्शन लाभले.
या ‘स्मार्ट बझर’मध्ये एआय तंत्रज्ञानासोबत कार्बन क्वांटम डॉट्स या नॅनोमटेरियल्सचा वापर करण्यात आला आहे. शरीरातील जैविक द्रवांमधील सूक्ष्म बदल ओळखून हे उपकरण संभाव्य कर्करोगाचे संकेत काही सेकंदांत शोधते. पारंपरिक तपासणी पद्धतींपेक्षा हे साधन अधिक वेगवान, संवेदनशील आणि तुलनेने कमी परवडणारे आहे.
या उपकरणाचे सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे ते मोबाइल ॲप किंवा इतर स्मार्ट डिव्हाइसशी सहज जोडता येते. महिलांच्या आरोग्य तपासणीदरम्यान हे साधन काही क्षणांत बायोसिग्नल्सचे विश्लेषण करून कर्करोगाची लवकर सूचना देते. त्यामुळे कर्करोगाचा प्रारंभिक टप्प्यातच शोध घेऊन योग्य वेळी उपचार सुरू करता येतात, ज्यामुळे मृत्यूदरात घट घडवून आणणे शक्य होणार आहे.
कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, रिसर्च डायरेक्टर डॉ. सी. डी. लोखंडे यांनी या संशोधनाबद्दल सर्व संशोधकांचे अभिनंदन केले आहे.
महिलांमधील कर्करोगाचा शोध घेणारा ‘स्मार्ट बझर’ विकसित
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
27
°
C
27
°
25.9
°
41 %
4.1kmh
20 %
Sun
28
°
Mon
28
°
Tue
29
°
Wed
29
°
Thu
28
°

