• आमदार सतेज पाटील यांच्या पाठपुराव्याला यश
कोल्हापूर :
शेंडापार्क, आर.के.नगर येथे आधुनिक कृषी भवन बांधण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडून ३५.३१ कोटी रुपयांच्या प्रकल्पाला गुरुवारी प्रशासकीय आणि वित्तीय मान्यता देण्यात आली आहे. काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी याबाबत तत्कालीन कृषिमंत्री धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे व विद्यमान कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना पत्र पाठवून कृषी भवन उभारण्याची मागणी केली होती. कृषी भवनसाठी मंजुरी मिळाल्याने आ. पाटील यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.
कृषी भवनच्या या इमारतीत प्रशासकीय कार्यालय, प्रयोगशाळा, वसतिगृह, गोदाम, कॅन्टीन, विक्री केंद्र आणि सुरक्षा रक्षक निवास अशा विविध सोयींचा समावेश असणार आहे. हे कृषी भवन कोल्हापूरमधील कृषी विभागाच्या कामकाजासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केलेल्या अंदाजपत्रकानुसार एकूण बांधकाम खर्च ३५ कोटी ३१ लाख ३० हजार रुपये इतका असेल. या रकमेपैकी पहिल्या टप्प्यात (२०२५-२६) ₹११ कोटी, दुसऱ्या टप्प्यात (२०२६-२७) ₹१२.५० कोटी आणि तिसऱ्या टप्प्यात (२०२७-२८) ११.८१ कोटी इतका खर्च करण्यात येईल. काम सुरू करण्यापूर्वी पर्यावरण विभाग, अग्निशमन विभाग तसेच स्थानिक प्राधिकरणांची आवश्यक मान्यता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. इमारतीच्या आराखड्यासाठी राज्य सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य वास्तुशास्त्रज्ञांनी तांत्रिक संमती दिली आहे.
शेंडापार्क येथे ३५ कोटींचे कृषी भवन
Mumbai
smoke
27
°
C
27
°
25.9
°
41 %
4.1kmh
20 %
Sun
28
°
Mon
28
°
Tue
29
°
Wed
29
°
Thu
28
°

