• ३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंत ऑनलाईन प्रवेशिका उपलब्ध
कोल्हापूर :
शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने डिसेंबर, २०२५ पासून सुरु होणाऱ्या महाराष्ट्र राज्य मराठी एकांकिका स्पर्धांसाठी महाविद्यालयांकडून दि. ३१ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन पध्दतीने प्रवेशिका मागविण्यात येत असल्याची माहिती बिभीषण चवरे संचालक, सांस्कृतिक कार्य यांनी दिली.
सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार व सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य मराठी एकांकिका स्पर्धा पार पडणार असल्याचे श्री. चवरे यांनी नमूद केले आहे.
महाराष्ट्र राज्य मराठी एकांकिका स्पर्धेची तालीम फेरी डिसेंबर, २०२५ पासून सुरु होणार असून जानेवारी, २०२६ मध्ये प्राथमिक व अंतिम फेरीचे आयोजन करण्यात येणार आहे.
या स्पर्धेची विहित नमुन्यातील प्रवेशिका, नियम संचालनालयाच्या https://mahanatyaspardha.com या वेबसाईटवर ऑनलाईन उपलब्ध होतील. आवश्यक त्या कागदपत्रासह प्रवेशिका दि. ३१ ऑक्टोबर, २०२५ पर्यंत ऑनलाईन सादर कराव्यात.
विहित मुदतीनंतर कोणत्याही परिस्थितीत प्रवेशिका स्विकारल्या जाणार नाहीत. प्रवेशिकेसोबत आवश्यक असणारी कागदपत्रे जोडलेली नसल्यास किंवा संपूर्ण तपशिल भरला नसल्यास ऑनलाईन प्रवेशिका भरता येणार नाही. राज्यातील जास्तीत जास्त महाविद्यालयांनी महाराष्ट्र राज्य मराठी एकांकिका स्पर्धेत आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन बिभीषण चवरे यांनी केले आहे.
——————————————————-
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य मराठी एकांकिका स्पर्धा
RELATED ARTICLES
Mumbai
clear sky
28.2
°
C
28.2
°
28.2
°
62 %
8.8kmh
3 %
Sat
28
°
Sun
30
°
Mon
31
°
Tue
29
°
Wed
29
°

