Homeइतरजिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध

• मतदारांनी याबाबत हरकती, सूचना सादर कराव्यात : डॉ. संपत खिलारी
कोल्हापूर :
राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य यांच्याकडून जिल्हा परिषद आणि त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम २३ सप्टेंबर २०२५ रोजी प्राप्त झाला आहे.
त्यानुसार, दि. १ जुलै २०२५ रोजी अस्तित्वात असलेली विधानसभा मतदार यादी संबंधित जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक विभाग (गट) आणि निर्वाचक गणांच्या अंतिम प्रभाग रचनेनुसार विभाजित करण्यात आली आहे.
या अनुषंगाने निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय तयार करण्यात आलेली प्रारूप मतदार यादी दिनांक ८ ऑक्टोबर २०२५ रोजी संबंधित तहसील कार्यालय आणि पंचायत समिती कार्यालय येथे नागरिक व मतदारांना पाहण्यासाठी प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच ही मतदार यादी जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूरच्या Kolhapur.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर तसेच https://mahasecvoterlist.in या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
या प्रारूप मतदार यादीवर नागरिक आणि मतदारांनी आपल्याकडून आवश्यक हरकती किंवा सूचना दि. १४ ऑक्टोबर २०२५ पर्यंत (सुट्टीचे दिवस वगळून) सादर कराव्यात, असे आवाहन उपजिल्हाधिकारी (महसूल) डॉ. संपत खिलारी यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
Mumbai
haze
29 ° C
29 °
29 °
74 %
3.1kmh
20 %
Wed
29 °
Thu
32 °
Fri
28 °
Sat
27 °
Sun
28 °

Most Popular

You cannot copy content of this page