Homeसामाजिकमराठवाड्यातील पूरग्रस्तांच्यासाठीची मदत रवाना

मराठवाड्यातील पूरग्रस्तांच्यासाठीची मदत रवाना

• पुढील टप्प्यात पुरग्रस्त भागात शालेय साहित्यांची मदत पाठवणार : आ. सतेज पाटील
कोल्हापूर :
विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आ. सतेज पाटील यांनी मराठवाड्यातील पूरग्रस्तांना मदतीसाठी आवाहन केलं होतं. त्यानुसार जमा झालेली मदत मराठवाड्यातील पूरग्रस्तांच्याकडे सोमवारी पाठवण्यात आली. कसबा बावडा, भगवा चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर खासदार शाहू महाराज आणि आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत मदतीची ही वाहने मराठवाड्याकडे रवाना झाली.
पूरामुळे जनजीवन उद्ध्वस्त झालेल्या मराठवाड्याला मदत करण्यासाठी धान्यासह किराणा सामान, प्रथमोचार साहित्य, सॅनिटरी पॅडस, चप्पल, पाणी बॉटल्स, कपड्यांपासून ते ब्लँकेटस, चटईपर्यत कोल्हापुरातील प्रत्येकान आपापल्या परीने खारीचा वाटा उचलला. यातून तब्बल २७ टेम्पो भरुन गोळा झालेली मदत सोमवारी खासदार शाहू छत्रपती आणि काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत मराठवाडा आणि सोलापूर जिल्ह्याकडे २५ टेम्पो मदत पाठवण्यात आली. जमा झालेली मदत धाराशिव, नांदेड, परभणी, लातूर आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी पाच टेम्पो पाठवण्यात आले.
यावेळी आ. जयंत आसगावकर, माजी आ. राजूबाबा आवळे, माजी आ. ऋतुराज पाटील, सूर्यकांत पाटील बुद्धीहाळकर, राहूल बजरंग देसाई, जीवन पाटील, सचिन चव्हाण, संजय मोहिते, माजी नगरसेवक राजेश लाटकर, राहुल माने, अर्जुन माने, दुर्वास कदम, मधुकर रामाणे, प्रताप जाधव, इंद्रजीत बोंद्रे, संदीप नेजदार, तौफीक मुल्लाणी, शशिकांत खोत, राजू साबळे, गोकुळचे संचालक प्रकाश पाटील, शशिकांत पाटील चुयेकर, बाबासो चौगले, बयाजी शेळके, संजय पोवार – वाईकर, सुप्रिया साळोखे, विनायक घोरपडे, सरलाताई पाटील, वैशाली महाडिक आदी उपस्थित

RELATED ARTICLES
Mumbai
clear sky
28.2 ° C
28.2 °
28.2 °
62 %
8.8kmh
3 %
Sat
28 °
Sun
30 °
Mon
31 °
Tue
29 °
Wed
29 °

Most Popular

You cannot copy content of this page