Homeशैक्षणिक - उद्योग जागतिक आघाडीच्या दोन टक्के संशोधकांत विवेकानंदचे डॉ. संजय लठ्ठे यांचा समावेश

जागतिक आघाडीच्या दोन टक्के संशोधकांत विवेकानंदचे डॉ. संजय लठ्ठे यांचा समावेश

कोल्हापूर :
जगभरातील आघाडीच्या दोन टक्के संशोधकांची ताजी यादी अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठाने नुकतीच जाहीर केली आहे. यात विवेकानंद कॉलेज कोल्हापूरच्या भौतिकशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ. संजय लठ्ठे यांना सलग सहाव्या वर्षी पुनर्मानांकन प्राप्त झाले आहे. स्टॅनफोर्ड विद्यापीठाने गतवर्षी जाहीर केलेल्या जागतिक स्तरावरील दोन टक्के आघाडीच्या संशोधकांच्या यादीत डॉ. संजय लठ्ठे यांना स्थान लाभले होते.
यंदाही डॉ. संजय लठ्ठे यांना पुनर्मानांकन लाभले आहे. यंदा स्टॅनफोर्ड विद्यापीठाने वेगवेगळ्या प्रकारच्या सूची जाहीर केल्या आहेत. त्यापैकी एक सूची संशोधकाच्या सार्वकालिक कारकिर्दीचा वेध घेऊन तयार केली आहे. दुसरी वार्षिक कामगिरीवर आधारित आहे. ‘स्कोपस’ डाटाबेसवर आधारित या यादीसाठी १९६० ते २०२४ या कालावधीमध्ये संशोधकीय योगदान देणाऱ्या संशोधकांचा विचार करण्यात आला आहे.
डॉ. लठ्ठे यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षच्या डॉ. श्रुती जोशी तसेच संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, सचिवा प्राचार्या शुभांगी गावडे, सीईओ कौस्तुभ गावडे आणि प्रबंधक सचिन धनवडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

RELATED ARTICLES
Mumbai
clear sky
30.7 ° C
30.7 °
30.7 °
44 %
1.4kmh
6 %
Wed
31 °
Thu
30 °
Fri
29 °
Sat
29 °
Sun
29 °

Most Popular

You cannot copy content of this page