Homeशैक्षणिक - उद्योग सिध्दोबा डोंगर परिसरात ५०० हून अधिक झाडांचे रोपण

सिध्दोबा डोंगर परिसरात ५०० हून अधिक झाडांचे रोपण

कोल्हापूर :
डीकेएएससी महाविद्यालयाचा एनएसएस विभाग आणि इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर सनराइज यांच्या संयुक्त विद्यमाने सिध्दोबा डोंगर परिसरात वृक्षारोपण समारंभ उत्साहात पार पडला. ‘तरुणांचा निर्धार, जलयुक्त शिवार’ या संकल्पनेतून घेण्यात आलेला हा उपक्रम ग्रामस्थ व एनएसएस स्वयंसेवक आणि निसर्गमित्रांच्या सहभागामुळे यशस्वी आणि प्रेरणादायी ठरला.
माले (ता. करवीर) येथे पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत इचलकरंजीच्या डॉ. डी.के.ए.एस.सी. महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभाग, इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर सनराइज आणि ग्रामपंचायत, माले यांच्या संयुक्त विद्यमाने सिध्दोबा डोंगर परिसरात सुमारे ५०० हून अधिक झाडे लावण्यात आली.
या उपक्रमाचे उ‌दघाटन शिवाजी वि‌द्यापीठ कोल्हापूर येथील एनएसएस विभागाचे संचालक डॉ. टी. एम. चौगले यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आले. याप्रसंगी ओझोन दिनाचे औचित्य साधत ओझोन थराच्या संरक्षणाबाबत माहिती देण्यात आली. महाविद्यालयाच्या स्वयंसेवकांनी लावलेल्या ५०० हून अधिक रोपांमध्ये प्रामुख्याने पिंपळ, वड, बकुळ, आपटा यासारख्या देशी झाडांची लागवड करण्यात आली. राष्ट्रीय सेवा योजनेच्या  विद्यार्थ्यांनी रविवारी खड्डे काढण्याचे काम केले होते आणि मंगळवारी झाडे लावण्याचे हे काम पाहून डॉ. चौगले यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. एस. के. खाडे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संयोजन महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. सुनील भोसले व डॉ. अजिंक्य पत्रावळे यांनी  केले. या वृक्षारोपण कार्यक्रमात इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर सनराइजच्या अध्यक्षा सौ. स्मिता खामकर, सौ. सुरेखा जाधव, सौ. दिव्या घाडगे, सौ. शिल्पा अष्टेकर, सौ. शमीम शेख व वनरक्षक प्रदीप जोशी उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयातील एन.एस.एस.चे सदस्य डॉ. सारिका पाटील, प्रा. पूजा पारिशवाड, प्रा. निलेश जाधव, प्रा. संदीप पाटील यांनी सक्रीय सहभाग नोंदवला. विशेष अतिथी म्हणून विवेकानंद कॉलेजमधील एनएसएसचे कार्यक्रम अधिकारी डॉ. संदीप पाटील व मराठी विषयाचे डॉ. प्रदीप पाटील यांची उपस्थिती होती.
या उपक्रमामध्ये स्थानिक ग्रामस्थांची उपस्थिती महत्त्वाची ठरली. प्रमुख पाहुणे म्हणून लोकनियुक्त सरपंच राहुल नानाबा कुंभार, उपसरपंच प्रतापराव बाळासो पाटील, माले विकास सेवा सोसायटी चेअरमन अमरसिंह पाटील, पोलीस पाटील संदीप साजनकर, संतोष खोत, राहुल कांबळे, सचिन डफळे, प्रा. सौरभ कुंभार आदी ग्रामपंचायत सदस्य तसेच अमोल पाटील सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
30 ° C
30 °
29.9 °
25 %
5.7kmh
1 %
Sat
29 °
Sun
27 °
Mon
29 °
Tue
29 °
Wed
29 °

Most Popular

You cannot copy content of this page