• उद्योगमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना जागेची पाहणी करून प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश
कोल्हापूर :
शाहूवाडी तालुक्यातील औद्योगिक विकासाचा नवा मार्ग मोकळा होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. शाहूवाडीत सुमारे ३५० हेक्टर क्षेत्रात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची (एमआयडीसी) उभारणी करण्याबाबत बुधवारी मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली.
दरम्यान, उद्योगमंत्री सामंत यांनी अधिकाऱ्यांना पुढील पंधरा दिवसांत शाहूवाडी तालुक्यातील उपलब्ध जागेची प्रत्यक्ष पाहणी करून सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले.
उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत शाहूवाडी तालुक्यातील अरुळ, आंबर्डे, करंजोशी, सावे, बजागेवाडी व शित्तुर तर्फ मलकापूर या गावांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
पन्हाळा तालुक्यातील आवळी येथे एमआयडीसी मंजूर झाली असून, तथापि कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योजकांची मागणी पाहता, अरुळ, आंबर्डे, करंजोशी, सावे, बजागेवाडी व शित्तुर तर्फ मलकापूर या पाच गावातील सुमारे ३५० हेक्टर जागा उपलब्ध आहे. सदर जमीन देण्याबाबत ग्रामस्थांनीही सकरात्मकता दर्शवली असल्याचे खासदार धैर्यशील माने आणि आमदार विनय कोरे यांनी मंत्रीमहोदयांच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे याठिकाणी आयटी पार्क, चर्मउद्योग, कृषी प्रक्रिया उद्योग अशा विविध उद्योगांची निर्मिती होऊ शकते. यामुळे शाहूवाडी व पन्हाळा तालुक्यातील युवकांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मितीचा मार्ग खुला होईल, असे मत बैठकीत मांडण्यात आले.
हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने व आमदार विनय कोरे यांनी शाहूवाडीत एमआयडीसी उभारणीची मागणी केली होती. त्यांनी या भागातील युवकांना रोजगार मिळावा, तसेच येथील नैसर्गिक साधनसामग्रीचा योग्य उपयोग व्हावा, यासाठी औद्योगिक विकासाची गरज असल्याचे स्पष्ट केले. शाहूवाडीत एमआयडीसी उभारणीचा निर्णय अंतिम झाला, तर हा भाग औद्योगिक नकाशावर ठळकपणे झळकणार असून स्थानिक युवकांसाठी हजारो रोजगार संधी निर्माण होणार आहेत.
यावेळी उद्योग विभागाचे सचिव डॉ. पी. अनबलगान, सहाय्यक व्यवस्थापक डॉ. विनय राठोड, डॉ. श्रीकांत पुलकुंडवार, किरण जाधव, संतोष भिंगे व उमेश देशमुख, जिल्हा परिषद माजी बांधकाम सभापती सर्जेराव पाटील (पेरीडकर) आदी उपस्थित होते.
शाहूवाडीत एमआयडीसी उभारणीसाठी मंत्रालयात बैठक
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
25
°
C
25
°
23.9
°
50 %
2.1kmh
20 %
Thu
26
°
Fri
26
°
Sat
25
°
Sun
26
°
Mon
27
°

