कोल्हापूर :
कोल्हापूर महानगरपालिका, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि विवेकानंद कॉलेज यांच्यावतीने श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या शिक्षणमहर्षी डॉ. बापुजी साळुंखे स्मृतीभवन येथे वुशू स्पर्धा उत्साहात पार पडल्या.
या स्पर्धेचे उदघाटन विवेकानंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार याच्या हस्ते झाले. प्रास्ताविक कोल्हापूर महानगरपालिकेचे क्रीडा निरीक्षक सचिन पांडव यांनी केले. यावेळी कोल्हापूर वुशू असोसिएशनचे अध्यक्ष अविनाश पाटील, डॉ. महेश कदम, लहू अंगज आदींसह सर्व शाळेचे क्रीडाशिक्षक, वुशू असोसिएशनचे पंच व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोल्हापूर शहरातील जवळपासस एकूण ११० विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते. या स्पर्धांमध्ये १४ वर्षाखालील, १७ वर्षाखालील व १९ वर्षाखालील मुले व मुली सहभागी होते. स्पर्धेचे नियोजन विवेकानंद महाविद्यालयाचे प्रा. संतोष कुंडले, प्रा. प्रशांत कांबळे, प्रा. समीर पठाण, प्रा. साद मुजावर व सुरेश चरापले यांनी केले.
——————————————————-
विवेकानंद कॉलेजमध्ये महानगरपालिकास्तर वुशू स्पर्धा
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
23
°
C
23
°
23
°
53 %
2.6kmh
52 %
Thu
26
°
Fri
26
°
Sat
25
°
Sun
26
°
Mon
27
°

