कोल्हापूर :
कोल्हापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमामार्फत सोमवार दि.२२ सप्टेंबर ते दि. १ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत शारदीय नवरात्रौत्सवानिमित्य भाविक प्रवाशांच्या सोईसाठी ‘श्री दुर्गादर्शन विशेष बस सेवा’ सुरु करणेत येत आहे. यावर्षी या सेवेसाठी वातानुकुलीत बसेस देणेत येणार आहेत.
या बससेवेचा आगाऊ आरक्षण तिकीट विक्री शुभारंभ शनिवारी (दि.२०) सकाळी १० श्री शाहू मैदान पास वितरण केंद्र येथे होणार आहे. या बससेवेसाठी प्रौढास रु.१८५ आणि ३ ते १२ वयोगटातील बालकांना रु.९५ असा दर निश्चित करण्यात आलेला आहे. दैनंदिन सकाळी ९ ते सायंकाळी ७ या वेळेत या बससेवेचे आगाऊ आरक्षण पास वितरित करण्यात येतील. बससंख्येअभावी चालूवर्षी ग्रुप बुकींग सेवा व जादा बसेस बंद ठेवण्यात आलेल्या आहेत.
अधिक माहितीसाठी श्री शाहू मैदान वाहतूक नियंत्रण केंद्र येथे दुर्गादर्शन सेवेचे प्रमुख सुनिल पाटील – ९८९००८०७९०, नितीन पोवार – ९४२२५८९८७८, ऑफीस – ०२३१-२६४४५६६ व ०२३१-२६४४५६८, पी. बी.साबळे – ८४८२८३८५०४ यांचेशी संपर्क साधावा.
तरी, कोल्हापूर शहर व परिसरातील भाविक प्रवासी नागरिकांनी या बससेवेचा लाभ घेऊन परिवहन उपक्रमास सहकार्य करावे असे आवाहन कोल्हापूर परिवहन उपक्रमामार्फत करण्यात आले आहे.
केएमटीची ‘श्री दुर्गादर्शन’ विशेष बससेवा सोमवारपासून
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
23
°
C
23
°
23
°
56 %
0kmh
64 %
Thu
26
°
Fri
26
°
Sat
25
°
Sun
26
°
Mon
27
°

