कोल्हापूर :
श्री अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रौत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. नवरात्रोत्सवासाठी करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दागिन्यांची स्वच्छता करण्यात आली. यामुळे या दागिन्यांना झळाळी प्राप्त झाली आहे.
साडेतीन शक्तिपीठापैकी एक असलेल्या करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात नवरात्रौत्सवात देवीची विविध रुपांत जडावी सालंकृत पूजा बांधण्यात येते. तसेच देवीसाठी नित्यालंकारासह नवरात्र उत्सवासाठी पारंपरिक दागिने देवीला परिधान केले जातात. गुरुवारी शारदीय नवरात्र उत्सव २०२५ च्या अनुषंगाने देवीला नवरात्र उत्सव कालावधीत परिधान केले जाणारे विविध सुवर्ण अलंकारांची स्वच्छता करण्यात आली. यामध्ये किरीट, कुंडले, चिंचपेटी, मंगळसूत्र, नेकलेस, ७ पदरी कंठी, ढोकळा हार, मोत्याची माळ, नवग्रह हार, पुतळयाची माळ, बोरमाळ, रुद्राक्ष माळ, पायातील तोडे, सिंह. चोपदार दंड, पालखीची तोंडे, चवऱ्या मोर्चेल, किरीट, कुंडले, मोरपक्षी, १६ पदरी चंद्रहार, म्हाळुंगी नथ, ठुशी, बोरमाळ, कवड्याची माळ, पादुका तसेच सुवर्ण पालखी इत्यादींचा समावेश होता.
धोंडीराम कवठेकर, गजानन कवठेकर, आनंद कवठेकर, महेश कडणे, संतोष नेतलकर, संकेत पवार, उदय लाड, उमेश लाड, शैलेश इंगवले, उमेश पोतदार, दिनेश सावंत यांनी देवीच्या दागिन्यांची स्वच्छता करण्याच्या सेवेत सहभाग घेतला.
श्री अंबाबाईच्या दागिन्यांना झळाळी
RELATED ARTICLES
Mumbai
clear sky
26.9
°
C
26.9
°
26.9
°
68 %
3.5kmh
0 %
Sun
27
°
Mon
28
°
Tue
27
°
Wed
27
°
Thu
28
°

