Homeकला - क्रीडाकेएसएची फुटबॉल संघ व खेळाडू नोंदणी ५ ऑक्टोबरपासून

केएसएची फुटबॉल संघ व खेळाडू नोंदणी ५ ऑक्टोबरपासून

कोल्हापूर :
कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशन (केएसए) च्यावतीने केएसए ‘ए’ डिव्हीजन फुटबॉल २०२५-२६ च्या हंगामासाठी संघ, खेळाडू व जिल्ह्याबाहेरील खेळाडूंची ऑनलाईन नोंदणी ५ ते ९ ऑक्टोबर दरम्यान होणार आहे.
सन २०२५-२६ या फुटबॉल हंगामासाठी वरिष्ठ गटातील १६ संघांनी यापूर्वी एआयएफएफकडे ऑनलाईन नोंदणी पूर्ण केली आहे. आता केएसएअंतर्गत नोंदणी केली जाणार आहे. यासाठी संघ व खेळाडू नियमित नोंदणी ५ ते ७ ऑक्टोबर तर विलंबाने ८ ते ९ ऑक्टोबरदरम्यान सायंकाळी ५ ते ७ या कालावधीत होणार असल्याची माहिती केएसएच्यावतीने ऑन. जनरल सेक्रेटरी माणिक मंडलिक व ऑन. फुटबॉल सेक्रेटरी राजेंद्र दळवी यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
     —————-
वरिष्ठ गटातील १६ संघ…
पाटाकडील तालीम मंडळ- (अ), खंडोबा तालीम मंडळ, श्री शिवाजी तरुण मंडळ, संयुक्त जुना बुधवार पेठ, दिलबहार तालीम मंडळ, बालगोपाल तालीम मंडळ, वेताळमाळ तालीम मंडळ, सम्राटनगर स्पोर्टस् , संध्यामठ तरूण मंडळ, झुंजार क्लब, फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ, पाटाकडील तालीम मंडळ- (ब), उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळ, प्रॅक्टीस फुटबॉल क्लब, सुभाषनगर फुटबॉल क्लब, रंकाळा तालीम मंडळ.

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
25 ° C
25 °
23.9 °
50 %
2.1kmh
20 %
Thu
26 °
Fri
26 °
Sat
25 °
Sun
26 °
Mon
27 °

Most Popular

You cannot copy content of this page