Homeशैक्षणिक - उद्योग एमपीएससीमध्ये हेरवाडची उत्कर्षा सुतार ओबीसी मुलींमध्ये राज्यात दुसरी

एमपीएससीमध्ये हेरवाडची उत्कर्षा सुतार ओबीसी मुलींमध्ये राज्यात दुसरी

कोल्हापूर :
हेरवाड (ता. शिरोळ) येथील कु. उत्कर्षा उषा उत्तम सुतार हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र गट – ब सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २०२४ मध्ये मोठे यश संपादन केले. ओबीसी मुलींच्या प्रवर्गातून राज्यात दुसरा क्रमांक मिळवण्याचा मान तिने पटकावला असून, सर्वसाधारण महिला प्रवर्गातून ती राज्यात १४व्या क्रमांकावर आली आहे. या उल्लेखनीय कामगिरीमुळे तिची विक्रीकर निरीक्षक (एसटीआय) या पदासाठी निवड झाली आहे.
उत्कर्षा सुतारचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा कन्या विद्या मंदिर हेरवाड व नृसिंहवाडी येथे झाले. त्यानंतर ८ वी ते १० वी पर्यंत तिने एस. पी.  हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले. पुढे ११ वी-१२ वी शिक्षण संजय घोडावत विद्यापीठात घेत इंजिनियरींगऐवजी स्पर्धा परीक्षा क्षेत्र निवडले. जयसिंगपूर कॉलेजमध्ये सायकॉलॉजी विषय घेत तिने विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळवला.
यानंतर पुण्यात तीन वर्षे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना महाराष्ट्र शासनाकडून दिल्लीत शिक्षण घेण्यासाठी तिला शिष्यवृत्ती मिळाली. दिल्लीमध्ये मिळालेल्या या संधीचा तिने उत्तम उपयोग करून स्पर्धा परीक्षांसाठी भक्कम पायाभरणी केली. तिने एकदा यूपीएससी परीक्षा दिली असता यश मिळाले नाही, मात्र हार न मानता एमपीएससी परीक्षेत तिने हे यश मिळवले आहे. तिच्या या यशामुळे हेरवाड गावात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण असून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
     —————
अपयशाने खचू नका…
या यशाबद्दल उत्कर्षा म्हणाली, यश मिळवायचे असेल तर सातत्य, संयम आणि कष्ट या त्रिसूत्रीवर विश्वास ठेवला पाहिजे. अपयश आले तरी खचून न जाता पुन्हा उभं राहणं महत्त्वाचं आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने आपला अभ्यास नियोजनपूर्वक करावा, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचा आधार घेऊन जिद्दीने प्रयत्न केले तर नक्कीच यश मिळते. माझं अंतिम ध्येय आयएएस अधिकारी होणं असून आणि त्यासाठी मी आणखी मेहनत घेणार आहे.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
30 ° C
30 °
27.9 °
42 %
3.1kmh
20 %
Thu
28 °
Fri
26 °
Sat
25 °
Sun
26 °
Mon
27 °

Most Popular

You cannot copy content of this page