Homeसण - उत्सवविसर्जन मिरवणुकीत लेटेस्ट तरुण मंडळचा 'ज्ञानेश्वर माऊली' चित्ररथ

विसर्जन मिरवणुकीत लेटेस्ट तरुण मंडळचा ‘ज्ञानेश्वर माऊली’ चित्ररथ

कोल्हापूर :
मंडळाच्या नावाप्रमाणेच सर्वकाही ‘लेटेस्ट’ करण्यात अग्रेसर असलेले मंगळवार पेठेतील लेटेस्ट तरुण मंडळने यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी ‘ज्ञानेश्वर माऊली’ चित्ररथ साकारला आहे. यावर्षीच्या गणेश विसर्जन मिरवणुकीचे ते आकर्षण ठरणार आहे.
याबाबत अधिक माहिती देताना लेटेस्ट तरुण मंडळचे संस्थापक अध्यक्ष गजानन यादव म्हणाले की, थोर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५०व्या जयंतीचे औचित्य साधून ‘लेटेस्ट संत ज्ञानेश्वर महाराज’ हा भव्य चित्ररथ व सजीव देखावा सादर केला आहे. याद्वारे गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज हे महान संत १३व्या शतकात महाराष्ट्रात होऊन गेले. त्यांचा जन्म पैठण जवळील आपेगाव येथे झाला. त्यांचे वडील विठ्ठलपंत कुलकर्णी यांनी पत्नी रुक्मिणीबाईंना न विचारता संन्यास घेतला होता म्हणून त्यांच्या गुरुंनी त्यांना पुन्हा संसार करण्याची आज्ञा दिली. त्यांना निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई अशी चार मुले झाली. ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या तोंडी वेद वदवून घेतले. थोरले बंधु निवृत्तीनाथ यांनी दिलेल्या आज्ञेनुसार मराठीमध्ये गीतेवर ‘ज्ञानेश्वरी ग्रंथ’ लिहिला. अभंग, भारुडही लिहिली. वयाच्या २१व्या वर्षी आळंदी येथे समाधी घेतली.
अशा या थोर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५०व्या जयंतीचे औचित्य साधून यावर्षी लेटेस्ट तरुण मंडळने ‘ज्ञानेश्वर माऊली’ हा चित्ररथ साकारला आहे. संत ज्ञानेश्वर व त्यांची भावंडं यांचा सजीव देखावा यासह विसर्जन मिरवणुकीत संत ज्ञानेश्वर महाराज यांचे जीवनप्रसंग चित्ररथावर आहेत. तसेच मंडळाचे ३५० कार्यकर्ते १२५ भगव्या झेंड्यासह वारकरी वेषात असतील.
भुये येथील पारंपारिक धनगर ढोल पथक व
गोलिवडे (ता. पन्हाळा) येथील १२० जणांचे झांझपथक व ढोलपथक आणि ७० महिलांचे माऊली टाळ-मृदंग पथक हे या मिरवणुकीत आकर्षण आहे.
मिरजकर तिकटी येथे शनिवारी (दि.६) सकाळी ११ वाजता श्री गणेश विसर्जन मिरवणुकीचा शुभारंभ ह.भ.प. श्री. महादेव यादव महाराज यांच्या हस्ते व माजी पोलीस उपअधीक्षक आर. आर. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होईल. याप्रसंगी बाळासो पोवार, शिवसेना जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले व प्रदीप भिडे यांची प्रमुख उपस्थिती आहे.
पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष प्रविण फडतरे, अजित पोवार, मिलिंद हिर्लोस्कर, अविनाश शिंदे, सागर भांडवले, संकेत जाधव, संदीप शेलार, संजय म्हेतर, आर्टिस्ट ललित चिकसकर, सौ. राधिका कालेकर, जान्हवी पाटील, स्वाती कारंडे आदींसह मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES
Mumbai
overcast clouds
26.3 ° C
26.3 °
26.3 °
80 %
2.4kmh
100 %
Thu
26 °
Fri
27 °
Sat
27 °
Sun
27 °
Mon
28 °

Most Popular

You cannot copy content of this page