कोल्हापूर :
तळसंदे येथील डी. वाय. पाटील कृषी व तंत्रज्ञान विद्यापीठाची एमसीए प्रथम वर्षाची विद्यार्थिनी गायत्री महेश गावडे हिची ‘गुगल स्टुडंट ॲम्बेसेडर -२०२५’साठी निवड झाली आहे. देशभरातून आलेल्या तब्बल ५०,००० हून अधिक अर्जांमधून निवडल्या गेलेल्या १५०० विद्यार्थ्यांमध्ये ती प्रतिनिधीत्व करणार आहे.
गुगलकडून २०२५ मध्ये पुन्हा नव्याने सुरू करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचा मुख्य हेतू “गुगल जेमिनी एआय” तंत्रज्ञानाचा प्रसार करणे हा आहे. गायत्री गावडे ॲम्बेसेडर म्हणून विद्यापीठ व गुगल यांच्यातील दुवा ठरणार आहे. कार्यशाळा, परिषद व विविध उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना गुगलच्या कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाची ओळख करून देण्यात ती महत्वाची भूमिका बजावेल.
याबाबत माहिती देताना गायत्री म्हणाली, ही निवड प्रक्रिया खूप कठीण होती. सर्वसमावेशक अर्ज व १५ मिनिटांची थेट मुलाखत या टप्प्यांतून मला ही संधी मिळाली. या कार्यक्रमाचा भाग होणे हा माझ्यासाठी सन्मान असून विद्यापीठात एआय तंत्रज्ञानाचा प्रसार व प्रभावी वापर करण्यासाठी मी प्रयत्न करेन.
सहा महिन्यांच्या कालावधीसाठी राबविण्यात येणाऱ्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांचे नेतृत्वगुण, संवादकौशल्ये आणि कार्यक्रम व्यवस्थापन कौशल्ये वृद्धिंगत करण्यावर भर दिला जाणार आहे. एआयचा वापर, चर्चेत सहभाग व नवनवीन संकल्पना मांडण्याची संधी मिळते.
कुलगुरू डॉ. के. प्रथापन म्हणाले, आमच्या विद्यार्थिनीची गुगलसारख्या जागतिक कंपनीच्या प्रतिष्ठित कार्यक्रमासाठी निवड होणे ही अभिमानाची बाब आहे. यामुळे आमच्या विद्यापीठाच्या गुणवत्तेची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.
कुलसचिव डॉ. जे. ए. खोत म्हणाले, गायत्रीने मिळवलेले यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे. तिच्या पुढील प्रवासासाठी विद्यापीठातर्फे आम्ही सहकार्य करू.
या निवडीबद्दल कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, कुलगुरू डॉ. के. प्रथापन, कुलसचिव डॉ. जे. ए. खोत, डॉ संग्राम पाटील यांनी अभिनंदन केले.
डी. वाय. पाटील कृषी विद्यापीठाच्या गायत्री गावडेची गुगल स्टुडंट ॲम्बेसीडरपदी निवड
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
36
°
C
36
°
31.9
°
46 %
4.6kmh
40 %
Thu
36
°
Fri
28
°
Sat
28
°
Sun
28
°
Mon
28
°