कोल्हापूर :
येथील श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संचलित, न्यू वुमन्स कॉलेज ऑफ फार्मसीला राज्य तंत्र शिक्षण मंडळ यांच्याकडून प्रथम श्रेणी प्राप्त झाली आहे.
राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबई यांच्या शैक्षणिक तपासणी अहवालाचा निकाल नुकताच जाहीर झाला ही श्रेणी प्रामुख्याने महाविद्यालयांमध्ये घेतली जाणारी नाविन्य शैक्षणिक पद्धती महाविद्यालयांमध्ये उपलब्ध असणाऱ्या सोईसुविधा, उपकरणे व महाविद्यालयांमध्ये राबविण्यात येणारे विविध प्रकारचे उपक्रम यावर ठरवली जाते. या निकषात महाविद्यालय पात्र ठरल्याने ही प्रथम श्रेणी प्राप्त झाल्याने महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
महाविद्यालयाचे अनुभवी क्रियाशील व सतत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणारे सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थिनींच्या उत्स्फूर्त प्रतिसादाच्या सहभागामुळे हे शक्य झाल्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य. डॉ. रवींद्र कुंभार यांनी सांगितले.
महाविद्यालयास प्रथम श्रेणी प्राप्त झालेबद्दल संस्थेचे चेअरमन डॉ. के. जी. पाटील, संचालक वैभवकाका नायकवडी यांनी प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
या प्रगतीसाठी संस्थेचे अध्यक्ष बी. जी. बोराडे, व्हा. चेअरमन डी. जी. किल्लेदार, खजानीस वाय. एस. चव्हाण, विकास अधिकारी प्राचार्य डॉ. संजय दाभोळे व सर्व संचालकाचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभत आहे.
——————————————————-
राज्य तंत्र शिक्षणकडून न्यू वुमन्स कॉलेज ऑफ फार्मसीला प्रथम श्रेणी प्राप्त
RELATED ARTICLES
Mumbai
overcast clouds
26.6
°
C
26.6
°
26.6
°
83 %
4.4kmh
100 %
Sun
28
°
Mon
27
°
Tue
28
°
Wed
28
°
Thu
26
°