कोल्हापूर :
पुणे जिल्हा मेट्रोपॉलिटन बॅडमिंटन संघटना(पीडीएमबीए) च्यावतीने आयोजित बीडब्ल्यूएफ, बीए, बीएआय आणि एमबीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या सुशांत चिपलकट्टी स्मृती करंडक योनेक्स सनराईज भारतीय कुमार आंतरराष्ट्रीय ग्रँड प्रिक्स १९ वर्षांखालील बॅडमिंटन स्पर्धेत महिला गटात हसना भारताच्या दियंका वाल्डिया, दिक्षा सुधाकर यांनी तर, पुरुष गटात सूर्याक्ष रावत यांनी प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.
पी.ई. सोसायटीज मॉडर्न पीडीएमबीए स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, शिवाजीनगर येथील बॅडमिंटन हॉलमध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेत मुख्य ड्रॉमध्ये उपांत्यपूर्व फेरीत महिला गटात भारताच्या दिक्षा सुधाकर हिने थायलंडच्या नवव्या मानांकित पिमचानोक सुथिविरियाकुलचा २१-१८, १९-२१, २१-०९ असा संघर्षपूर्ण पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली. हा सामना ४६ मिनिटे चालला. जपानच्या दहाव्या मानांकित युरीका नागाफुचीने सहाव्या मानांकित भारताच्या वेण्णाला कलागोटलाला २१-१५, २२-२० असे पराभूत केले. जपानच्या युझुनो वातानाबे हिने अव्वल मानांकित खेळाडूवर सनसनाटी विजय मिळवणाऱ्या भारताच्या हसना श्री मल्लवरपूचे आव्हान २१-१६, २१-१७ असे संपुष्टात आणले. हा सामना ३७ मिनिटे चालला. चुरशीच्या लढतीत भारताच्या दियंका वाल्डियाने रिशीका नंदीचा २१-०९, १३-२१, २१-१२ असा कडवा प्रतिकार केला. हा सामना ४५ मिनिटे चालला.
पुरुष गटात नवव्या मानांकित जपानच्या काझुमा कावानोने भारताच्या वंश देवचा २१-१४, २१-१८ असा तर, चौदाव्या मानांकित तैपेईच्या चुंग हसियान यिहने भारताच्या जगशेर सिंग खंगुर्राचा २१-१६, २१-१८ असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली. भारताच्या चौथ्या मानांकित सूर्याक्ष रावत हिने तंकारा ज्ञान तलसिलावर २१-१४, ११-० असा विजय मिळवला. जपानच्या दुसऱ्या मानांकित ह्युगा टाकानो याने भारताच्या पाचव्या मानांकित नितिन बालसुब्रमण्यमला २१-१२, २१-११ असे पराभूत केले.
मिश्र दुहेरीत उपांत्यपूर्व फेरीत भारताच्या बोर्निल आकाश चांगमाई व झेनिथ अबीगेल या जोडीने अव्वल मानांकित भारताच्या भव्य छाब्रा व एंजल पुणेरा यांचा २३-२१, २१-१७ असा पराभव करून सनसनाटी निकाल नोंदवला.
बॅडमिंटन स्पर्धेत दियंका वाल्डिया, दिक्षा सुधाकर, सूर्याक्ष रावत उपांत्य फेरीत
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
26
°
C
26
°
24.9
°
41 %
3.1kmh
2 %
Mon
28
°
Tue
29
°
Wed
29
°
Thu
29
°
Fri
28
°

