• सलग दोनवेळा डुरंड कप जिंकणाऱ्या विजेत्या संघाचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते गौरव
कोल्हापूर :
सलग दोनवेळा डुरंड कप जिंकून तीन दशकांनंतर इतिहास घडवणाऱ्या नॉर्थईस्ट युनायटेड एफ.सी.ला भारताच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रेसिडेंट्स कपने राष्ट्रपती भवनात झालेल्या विशेष समारंभात गौरविण्यात आले.
दरम्यान, २३ ऑगस्ट २०२५ रोजी कोलकात्यात झालेल्या अंतिम सामन्यात नॉर्थईस्ट युनायटेड एफ.सी.ने डायमंड हार्बर एफ.सी.ला ६–१ ने पराभूत करून १३४व्या इंडियन ऑइल डुरंड कप वर स्वतःचे नाव कोरले.
आशियातील सर्वात जुनी क्लब स्पर्धा असलेल्या डुरंड कपच्या विजेत्याला एकूण तीन ट्रॉफी दिल्या जातात: डुरंड कप (इ.स. १८८८ मध्ये स्थापित), शिमला ट्रॉफी (१९०३ मध्ये शिमल्यातील नागरिकांनी भेट दिलेली), आणि प्रेसिडेंट्स कप (१९५६ मध्ये तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी स्थापित केलेली). यावर्षी प्रथमच राष्ट्रपतींनी विजेत्या संघाला राष्ट्रपती भवनात आमंत्रित करून गौरविले.
याप्रसंगी संघाचे मालक जॉन अब्राहम यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. हा क्षण संपूर्ण ईशान्य भारत प्रदेशासाठी आणि देशासाठी अभिमानाचे प्रतीक आहे. नॉर्थईस्ट युनायटेड एफ.सी.च्या कामगिरीची दखल स्वतः माननीय राष्ट्रपतींनी घेतली, हा आमच्यासाठी आजवरचा सर्वात मोठा सन्मान आहे. हा गौरव मी संपूर्ण ईशान्य भारतातील जनतेला अर्पण करतो, ज्यांचा उत्साह, जिद्द आणि पाठिंबा आम्हाला प्रेरणा देत असतो.
संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार ताम्हाणे म्हणाले की, राष्ट्रपतींच्या हस्ते प्रेसिडेंट्स कप प्राप्त करणे हा क्षण नॉर्थईस्ट युनायटेड एफ.सी. आणि भारतीय फुटबॉलच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल. राष्ट्रपती भवनात आमंत्रण देऊन, विजेत्या संघाचा गौरव करून राष्ट्रपतींनी दिलेला हा सन्मान भारतीय फुटबॉलसाठी एक ऐतिहासिक घटना आहे. त्याचबरोबर मी डुरंड कप संयोजन समिती व ईस्टर्न कमांड ह्यांनी आम्हाला आज ही संधी दिली त्याबद्दल त्यांचे देखील मनःपूर्वक आभार मानतो.
या समारंभात क्लबचे प्रतिनिधित्व जॉन अब्राहम, मंदार ताम्हाणे, भारतीय सहाय्यक प्रशिक्षक अमोघ अडीगे, संघाच्या कारधारांपैकी एक रिडीम त्लांग, गोल्डन ग्लोव्ह विजेता गुरमीत सिंग आणि अंतिम सामन्यात पहिला गोल करणारा नागपूरचा अशीर अख्तर यांनी केले.
—————-
संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी ताम्हाणे हे पुण्याचे असून गेली दोन दशके त्यांनी भारतीय फुटबॉलसाठी वेगवेगळ्या स्तरावर काम केले आहे. भारतीय फुटबॉल संघाचे व्यवस्थापक, बेंगळुरू एफ. सी. चे मुख्य कार्यकारी अधिकारी व आता नॉर्थईस्ट युनायटेड एफ.सी.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अशी त्यांची कारकीर्द राहिली आहे. ह्याचबरोबर ते पूना डिस्ट्रिक्ट फुटबॉल संघटनेचे उपाध्यक्ष देखील आहेत.
संघाचे सहाय्यक प्रशिक्षक अडीगे हे देखील मूळचे पुण्याचे रहिवासी आहेत. २०२४ साली अडीगे यांनी संघाचे विश्लेषक म्हणून भूमिका निभावली होती. या स्पर्धेत त्यांनी सहाय्यक प्रशिक्षक या भूमिकेतून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता.
राष्ट्रपतींकडून नॉर्थईस्ट युनायटेड एफ.सी.चा प्रेसिडेंट्स कपने सन्मान
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
26
°
C
26
°
24.9
°
41 %
3.1kmh
2 %
Mon
28
°
Tue
29
°
Wed
29
°
Thu
29
°
Fri
28
°

