• सहा ते सात पिढ्यांपासून पर्यावरणपूरक गणेशमूर्तीची परंपरा
कोल्हापूर :
करवीर तालुक्यातील भुये येथील संतु पाटील घराण्याने आजही पर्यावरणपूरक गणेशमूर्तीची परंपरा जपली आहे. गणेश चतुर्थीला शाडूच्या मातीची, रंगविरहित, सिंहासनाधिष्ठित व एकसंध आकाराची गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. सहा ते सात पिढ्यांपासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करून घेतली जाते.
संतु पाटील घराण्यात पूर्वीपासून गणेश चतुर्थीला साध्या पध्दतीची गणेशमूर्ती घरी आणली जाते. पाटील घराण्यात पूर्वापार चालत आलेली ही परंपरा सध्याही जपली जाते. या घराण्यातील सध्याची पिढीही पर्यावरणपूरक गणेशमूर्तीची परंपरा आजही उत्साहाने जपत आहे. ही परंपरा समाजाला पर्यावरण रक्षणाचा महत्त्वपूर्ण संदेश देणारी ठरत आहे.
आजकाल अनेक ठिकाणी गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) च्या मूर्ती व रासायनिक रंगांचा सर्रास वापर केला जातो. त्यामुळे नद्यांचे व जलस्रोतांचे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत आहे. अशा परिस्थितीत भुये गावातील संतु पाटील घराण्याची परंपरा समाजासाठी एक आदर्श ठरत आहे.
गेल्या सहा ते सात पिढ्यांपासून या घराण्यात शाडू मातीची, रंगविरहित, सिंहासनाधिष्ठित व एकसंध आकाराची गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. या मूर्तींचे वैशिष्ट्य म्हणजे ती संपूर्णतः पर्यावरणपूरक असते. कोल्हापूरातील पापाची तिकटी येथील मूर्तीकार अनिल वागवेकर (कुंभार) हे पाटील घराण्याची गणेशमूर्ती तयार करतात.
गणेश चतुर्थीला सजावटीसाठीही यंदा पूर्णतः पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करण्यात आला आहे. यात कागदाच्या झुरमुळ्या (पताका) वापरल्या असून, कोणत्याही प्रकारच्या प्लास्टिकचा वापर करण्यात आलेला नाही. सध्या संतु पाटील घराण्याची सहावी ते सातवी पिढी या परंपरेला पुढे नेत आहे. ही परंपरा केवळ धार्मिक नसून सामाजिक जागृती करण्याची परंपरा आहे. सध्या अनेक कारणांनी प्रदूषण वाढत आहे. जलप्रदूषण रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. जलप्रदूषणाचा वाढता धोका लक्षात घेता, आपल्या घरातील गणेशमूर्ती शाडूच्या मातीचीच असावी आणि त्यासाठी प्रत्येकाने पर्यावरण रक्षणात आपले योगदान द्यावे, असे आवाहनही यानिमित्ताने अमर पाटील यांनी केले आहे.
यंदाच्या गणेश चतुर्थीला गणेशमूर्ती प्रतिष्ठापनाप्रसंगी अमर पाटील, सविता पाटील, प्रणव पाटील, प्रणिता पाटील, पार्थ पाटील, केदार पाटील, ऋतुजा पाटील आदी पाटील कुटुंबीय उपस्थित होते.
संतु पाटील घराण्याची पर्यावरणपूरक गणेशमूर्ती
RELATED ARTICLES
Mumbai
overcast clouds
26
°
C
26
°
26
°
89 %
5.8kmh
100 %
Sat
27
°
Sun
28
°
Mon
27
°
Tue
27
°
Wed
27
°