Homeसण - उत्सवशाडूच्या गणेशमूर्तीना मागणी

शाडूच्या गणेशमूर्तीना मागणी

कोल्हापूर :
श्रावणापासूनच गणेशभक्तांना लाडक्या गणरायाच्या आगमनाची ओढ लागलेली असते. काही दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवाची घरोघरी तयारी सुरू आहे. गेल्या काही वर्षांपासून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याकडे कल वाढला आहे. त्यामुळे गणेशोत्सवासाठी आता घरोघरी शाडूच्या गणेशमूर्ती घेतल्या जातात. कोल्हापुरातील मूर्तिकार पर्यावरणपूरक शाडूच्या गणेशमूर्ती तयार करीत आहेत.
गणेशभक्तांच्या मागणीनुसार मूर्ती बनवली जाते. मुंबई पॅटर्न गणपतीसह पारंपरिक पध्दतीच्या गणेशमूर्ती तसेच खुल्या स्वरूपातील मूर्तींचे सर्वांनाच आकर्षण असते. अशा मूर्ती तयार करून मिळत असल्याने सध्या पर्यावरणपूरक शाडूच्या गणेशमूर्तींना खूप मागणी आहे.
गणेशोत्सव म्हटलं की ओढ लागते ती एका सुंदर गणेशमूर्तीची! दरवर्षी मूर्ती कोणती घ्यायची असा प्रश्न अनेक गणेशभक्तांना पडतो. गणेशभक्त आपली गणेशमूर्ती कशी असावी यासाठी खूप आधी पासूनच नियोजन करत असतात. महाराष्ट्रात मोठ्या स्वरूपात गणेशोत्सव साजरा केला जातो, तेथील उंच आणि खुल्या मूर्तींचे आकर्षण सर्वांनाच असते. मनमोहक, व सुबक आकारातील त्या गणेशमूर्ती डोळ्यासमोर ठेवून कोल्हापुरातील अनेक गणेशभक्त तशा मूर्ती बनवून घेत आहेत.
सोशल मीडियामुळे हल्ली खुल्या स्वरूपातील मूर्तींचे विविध फोटो उपलब्ध होत आहेत. या भव्यदिव्य आणि आकर्षक असलेल्या मूर्ती आता लहान स्वरुपात बनवून घरगुती गणेशोत्सवासाठी पूजल्या जातात. त्यामुळे अशा खुल्या स्वरूपातील मूर्ती घेणाऱ्या गणेशभक्तांचे प्रमाण वाढले आहे. सुरुवातीला अशा खुल्या मूर्ती पीओपीमध्ये बनवल्या जात होत्या. पण सध्या पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याकडे गणेशभक्तांचा कल आहे. पीओपीपासून बनविलेल्या गणेशमूर्तीचा वापर टाळण्यासाठी आणि शाडू मातीच्या मूर्तीपेक्षाही वजनाला हलकी असणारी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती साकारल्या जात असल्यामुळे शाडूच्या गणेशमूर्तींची मागणी वाढली आहे.
यातूनच कोल्हापुरातील बापट कॅम्प येथील संत गोरा कुंभार वसाहत, गंगावेश, शाहूपुरी येथील कुंभार गल्लीतील मूर्तिकार गणेशभक्तांच्या मागणीनुसार शाडूमातीमध्ये खुल्या गणेशमूर्ती बनविण्यावर भर देतात. शाडूमातीमध्ये खुल्या मूर्ती बनवणे तसे अवघड काम आहे. पण गणेशभक्तांचा पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याकडे असलेला कल लक्षात घेऊन मूर्तिकारांनी खुल्या मूर्ती बनवण्यास सुरुवात केली आहे.
          ————–
शाडूच्या गणेशमूर्तींना पसंती…
पर्यावरणपूरक गणेशोत्सवामुळे पूर्वीप्रमाणेच शाडूच्या गणेशमूर्तींना खूपच मागणी आहे. यावर्षी मुंबईचा इच्छापूर्ती गणेश, लालबागचा राजा, मुंबई पॅटर्न गणपती, दत्त रुपातील गणपती, वारकरी संप्रदाय गणपती, सायकलवरील गणेशमूर्ती शाडूमातीमध्ये बनवले असून त्याला मागणी वाढत आहे. याबरोबरच श्रीकृष्ण, श्री स्वामी समर्थ, बालगणेश मूर्ती, प्राणी व पक्षी यांच्या समवेतील गणेशमूर्ती अशा विविध रूपातील तसेच पारंपरिक पध्दतीच्या गणेशमूर्तींना पसंती आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सवामुळे पूर्वीप्रमाणेच शाडूच्या गणेशमूर्तींना खूपच मागणी आहे. शाडूची सहा इंच गणेशमूर्ती अमेरिकेत महिन्यापूर्वी पाठवली आहे.
    सतिश वडणगेकर
               मूर्तिकार

RELATED ARTICLES
Mumbai
overcast clouds
26 ° C
26 °
26 °
89 %
5.8kmh
100 %
Sat
27 °
Sun
28 °
Mon
27 °
Tue
27 °
Wed
27 °

Most Popular

You cannot copy content of this page