Homeशैक्षणिक - उद्योग घोडावत इन्स्टिट्यूटच्या वर्धापन दिनानिमित्त  विविध राष्ट्रीय स्पर्धा

घोडावत इन्स्टिट्यूटच्या वर्धापन दिनानिमित्त  विविध राष्ट्रीय स्पर्धा

कोल्हापूर :
संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या १३व्या वर्धापन दिनानिमित्त ‘निंबस २ के २५’ या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेद्वारे २३ ऑगस्ट रोजी वर्धापनदिन उत्साहात साजरा होणार आहे.

या कार्यक्रमात नवोन्मेष, प्रेरणा आणि उत्सव यांचा सुंदर संगम पहायला मिळणार आहे. नाविन्यपूर्ण राष्ट्रीय स्पर्धेमध्ये कॅड बस्टर, पोस्टर प्रेसेंटेशन, सर्किट्रिक्स हँक हंट, मेलोडी मस्ती, तसेच कौन बनेगा सवालों का सरताज अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून देशभरातील विद्यार्थी यात सहभागी होणार आहेत. विजेत्यांसाठी रु. १,००,००० पर्यंतची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. प्रत्येक सहभागी विद्यार्थ्यास प्रमाणपत्र दिले जाणार आहे. यावेळी रक्तदान शिबिर व पुस्तक दान उपक्रम या सामाजिक जबाबदारीशी निगडित कार्यक्रमांचाही समावेश केलेला असून, विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भान निर्माण करण्याचा इन्स्टिट्यूटचा मुख्य हेतू आहे.
घोडावत इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. विराट गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम होणार आहे. इंजिनिअरिंग क्षेत्रात करिअर करत असलेल्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा असे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी ऑनलाईन नोंदणी अनिवार्य असून, इन्स्टिट्यूटच्या संकेतस्थळावर तसेच खालील लिंकवरून नोंदणी करता येणार आहे : https://forms.gle/mpcvXZg8vAcU1HX48
या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी समन्वयक प्रा. एम. एस. काळे, प्रा. सौ. एन. एस. सासने व टीम परिश्रम घेत आहे. या कार्यक्रमाला संजय घोडावत विद्यापीठाचे चेअरमन संजय घोडावत व विश्वस्त विनायक भोसले यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

RELATED ARTICLES
Mumbai
overcast clouds
26.1 ° C
26.1 °
26.1 °
88 %
5kmh
100 %
Sat
27 °
Sun
28 °
Mon
27 °
Tue
27 °
Wed
27 °

Most Popular

You cannot copy content of this page