• एनआयटीच्या ‘दीक्षारंभ’ या कार्यक्रमाचे अच्युत गोडबोले प्रमुख पाहुणे
कोल्हापूर :
श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संचलित उचगांव येथील न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजी (एनआयटी) मधील नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांसाठीच्या ‘दीक्षारंभ’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे अच्युत गोडबोले प्रमुख पाहुणे आहेत. बुधवारी (दि.२०) सकाळी १०:३० वाजता सायबर संस्थेच्या आनंदभवन या सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे.
श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संचलित उचगांव येथील न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजीमधील नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांसाठीच्या ‘दीक्षारंभ’ या कार्यक्रमात सुप्रसिद्ध उद्योजक, तंत्रज्ञ, लेखक, वक्ते अच्युत गोडबोले प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित आहेत. यामध्ये ते विद्यार्थी, पालक, शिक्षक यांना संबोधित करणार आहेत. शैक्षणिक व्यासपीठांवर कृत्रिम बुद्धिमत्ता व अनुषंगिक तंत्रज्ञान या विषयावर बोलण्याचा त्यांचा कल असतो.
बुधवारी (दि. २०) होणाऱ्या सायबर संस्थेच्या आनंदभवन या सभागृहात बुधवारी कार्यक्रमाचा कोल्हापूरातील शैक्षणिक व औद्योगिक क्षेत्रातील इच्छुकांनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन एनआयटीचे प्राचार्य डाॅ. संजय दाभोळे यांनी केले आहे.
अच्युत गोडबोले यांचे उद्या व्याख्यान
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
32
°
C
32
°
31.9
°
17 %
4.1kmh
0 %
Thu
32
°
Fri
27
°
Sat
27
°
Sun
28
°
Mon
28
°

