Homeशैक्षणिक - उद्योग गोकुळच्या दूध उत्पादकांना नेहमीच सर्वाधिक दूध दर : आ.सतेज पाटील

गोकुळच्या दूध उत्पादकांना नेहमीच सर्वाधिक दूध दर : आ.सतेज पाटील

कोल्हापूर :
गेल्या चार वर्षांत गोकुळने शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दर देण्याची भूमिका घेतली असून म्हैशीसाठी रुपये १२ व गायीसाठी रुपये ६ इतकी दरवाढ केली तर म्हैस खरेदीसाठी ५० हजार पर्यंत अनुदान योजना सुरू केली आहे, असे आमदार सतेज पाटील यांनी सांगितले. ते गोकुळ संलग्न करवीर तालुक्यातील प्राथमिक दूध संस्था संपर्क सभेत बोलत होते.
कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ (गोकुळ)शी संलग्न करवीर तालुक्यातील प्राथमिक दूध संस्था संपर्क सभा सोमवार (दि.१८) संकल्पसिद्धी मंगल कार्यालक पुईखडी, कोल्हापूर येथे आमदार सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ यांच्‍या अध्यक्षतेखाली तसेच संचालक मंडळाच्या उपस्थित पार पडली.
आ. सतेज पाटील म्हणाले की, करवीर तालुक्यातून गोकुळच्या संपर्क दौऱ्याची सुरुवात करताना आनंद होत आहे. या दौऱ्यातून शेतकरी व संस्थांच्या अडचणी जाणून घेऊन त्यावर तोडगा काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करणार आहोत. गोकुळचा ब्रँड हा म्हैस दूधाचा असून शेतकऱ्यांना यामध्ये अधिक फायदा मिळावा हे आमचे ध्येय आहे. संस्थेच्या ठेवी ५१२ कोटींवर पोहोचल्या असून उलाढाल ४ हजार  कोटीवर गेली आहे. मुंबईत पॅकेजिंग प्रकल्प, सोलर प्रकल्प अशा उपक्रमांमधून संस्थेची बचत होत आहे. दूध संकलन २० लाख लिटरवरून २५ लाख लिटरकडे वाटचाल करत आहे. गोकुळची वाटचाल ही शेतकऱ्यांच्या सहकार्याने, पारदर्शक आणि काटकसरीत राहणार आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे समाधान करणे हाच आमचा प्रयत्न राहील.
यावेळी बोलताना गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ म्हणाले की, गोकुळच्या म्हैस दुधाला बाजारपेठेमध्ये मोठी मागणी आहे. त्यामुळे म्हैस दुधाच्या वाढीसाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासाठी संघाने जातिवंत म्हैस खरेदी अनुदान तसेच जातिवंत वासरू संगोपन अनुदानात वाढ केली आहे. दूध व्यवसायाच्या स्थैर्यासाठी ही पावले अत्यंत महत्त्वाची ठरणार आहेत. शेतकऱ्यांनी या सर्व योजनांचा लाभ घ्यावा. भविष्यात गाभण जनावरांसाठी प्रेग्नन्सी रेशन पशुखाद्य संघामार्फत लवकरच उपलब्ध करून दिले जाणार आहे. तसेच राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत हिफर रेडिंग प्रोग्रॅम (एचआरपी) आणि जातिवंत म्हैस रेडी संगोपन केंद्र योजना मोठ्या प्रमाणावर राबवली जाणार आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दर्जेदार जातिवंत जनावरे (रेडी) सहज उपलब्ध होणार आहेत. तसेच दूध उत्पादकांनी आपल्या जनावरांसाठी विमा योजना, अनुदान योजना व इतर सेवा सुविधांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. गोकुळच्या सेवांचा प्रभावी वापर करून दूध उत्पादन वाढवण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी संघाचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील म्हणाले की, संघाचे गाय दूध संकलनात वाढ होत असून म्हैस दूध संकलन वाढण्याचे गरज आहे. तरी करवीर तालुक्यात संघाच्या विविध योजना तसेच स्व.आनंदराव पाटील-चुयेकर म्हैस दूध वाढ कृती कार्यक्रम प्रभावीपणे राबवून म्हैस दूध संकलन वाढविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत.
या संपर्क सभेस दूध संस्था प्रतिनिधी यांनी संस्था कर्मचारी प्रोत्साहन निधीमध्ये वाढ करावी, जातिवंत म्हैशीचे रेतन जास्तीत जास्त प्रमाणात संघाने उपलब्ध करून द्यावी तसेच सुक्या वैरणीच्या अनुदानात वाढ करावी या विषयावरती चर्चा करण्यात आली. तसेच शिवाजी देसाई (भामटे), प्रविण पाटील (कावणे), के. डी. पाटील (खुपिरे), नारायण पाटील (भामटे) आदि संस्था प्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना चेअरमन नविद मुश्रीफ व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले, संघाचे अधिकारी यांनी समर्पक उत्तरे दिली. किसान विमा पॉलिसी अंतर्गत अपघाती मृत पावलेल्या सभासदांच्या वारसांना व मृत्यूमुखी पडलेल्या जनावरांच्या मालकांना विमा रक्कमेचे धनादेश वाटप करण्यात आले. संकलन, पशुसंवर्धन, वैरण विकास, पशुखाद्य, वित्‍त, मिल्‍कोटेस्‍टर, संगणक, गुणनियंञण या विभागावर सविस्‍तर चर्चा होवून अडचणी समजावून घेवून त्‍या प्रश्‍नांचे निरसन करण्‍यात आले तसेच विविध सूचनांची नोंद घेण्यात आली.
यावेळी स्‍वागत संचालक बाबासाहेब चौगले व प्रास्ताविक संचालक शशिकांत पाटील-चुयेकर यांनी केले. आभार संचालक संभाजी पाटील यांनी मानले.
याप्रसंगी संचालक अरुण डोंगळे, अजित नरके, कर्णसिंह गायकवाड, प्रकाश पाटील, सुजित मिणचेकर, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, बाळासो खाडे, चेतन नरके, युवराज पाटील, राजेंद्र मोरे, मुरलीधर जाधव, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले, केडीसीसी.बँकचे, गोकुळचे अधिकारी तसेच करवीर तालुक्यातील दूध संस्थांचे चेअरमन, संचालक, प्रतिनिधी, दूध उत्पादक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
broken clouds
27.4 ° C
27.4 °
27.4 °
82 %
5.5kmh
84 %
Sat
27 °
Sun
27 °
Mon
27 °
Tue
27 °
Wed
27 °

Most Popular

You cannot copy content of this page