कोल्हापूर :
‘टँगो मल्हार या चित्रपटात एका रिक्षा चालकाची गोष्ट उलगडण्यात आली आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लॉन्च करण्यात आले असून १९ सप्टेंबरला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
चित्रपट या माध्यमाची जादू काही औरच आहे. कोणत्याही क्षेत्रात काम केले, तरी स्वतः चित्रपट करण्याची उर्मी काहींना स्वस्थ बसू देत नाही. संगणक शास्त्रज्ञ तसेच उद्योजिका असलेल्या साया दाते यांनी आगामी ‘टँगो मल्हार’ या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाची निर्मिती ॲगलेट्स अँड आयलेट्स प्रॉडक्शन या निर्मिती संस्थेअंतर्गत करण्यात आली असून साया दाते या निर्मात्या आहेत.
या चित्रपटात एका रिक्षा चालकाची गोष्ट उलगडण्यात आली आहे. काहीतरी नवीन करू पाहणाऱ्या तरुण अशा मल्हारला अचानकपणे “टँगो” या अर्जेटिनाच्या नृत्य प्रकाराचा शोध लागतो आणि त्याची आवड निर्माण होते. या नृत्य प्रकारामुळे त्याच्या आयुष्यात काय काय गोष्टी रंजकपणे घडत जातात, या कथासूत्रावर ‘टँगो मल्हार’ हा चित्रपट बेतला आहे.
चित्रपटाच लेखन साया दाते, मनीष धर्मानी यांनी केले आहे. सुमेध तरडे, ओंकार आठवले यांनी छायांकन, क्षमा पाडळकर यांनी संकलन, तुषार कांगारकर यांनी ध्वनी आरेखन, शार्दूल बापट, उदयन कानडे यांनी संगीत आणि पार्श्वसंगीत केले आहे. चित्रपटात नितेश कांबळे, कीर्ति विश्वनाथन, सीमा वर्तक, अक्षय गायकवाड, मनीष धर्मानी, मनीषा महालदार, संदेश सूर्यवंशी, पंकज सोनावणे या नवोदित कलाकरांचा अभिनय आपल्याला पहायला मिळणार आहे.
साया दाते यांनी अमेरिकेतील प्रतिष्ठित “मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी” (एमआयटी) येथून मॅकेनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी दहा वर्षं तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात काम करताना अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅलीत युट्यूबमध्ये काम केले, त्यानंतर भारतात परत येऊन पुण्यात स्वतःची कंपनी उभी केली. उद्योग क्षेत्रातील कामगिरीसाठी प्रतिष्ठित फोर्ब्जच्या ‘३० अंडर ३०’ या यादीत त्यांना स्थान मिळालं होतं.
साया दाते यांनी वयाच्या १२व्यावर्षी ‘ऑन द अदर लाइन’ ही शॉर्टफिल्म दिग्दर्शित केली होती. अनेक आंतरराष्ट्रीय महोत्सवात ही शॉर्टफिल्म गौरवली गेली. त्याशिवाय त्या स्वतः टँगो डान्सरही आहेत. एकीकडे तंत्रज्ञान, उद्योगात काम करत असताना कलेची आवड त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यामुळे आपली आवड जपण्यासाठी त्यांनी ‘टँगो मल्हार’ चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले आहे.
——————————————————-
‘टँगो मल्हार’ चित्रपटातून उलगडणार एका रिक्षाचालकाचा प्रेरणादायी प्रवास
RELATED ARTICLES
Mumbai
broken clouds
27.4
°
C
27.4
°
27.4
°
82 %
5.5kmh
84 %
Sat
27
°
Sun
27
°
Mon
27
°
Tue
27
°
Wed
27
°