कोल्हापूर :
बीसीसीआय मार्फत घेण्यात येणाऱ्या दुलीप ट्राॅफी (चार दिवसीय) स्पर्धेसाठी कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा माजी खेळाडू महेश पाटील यांची पश्चिम विभाग (वेस्ट झोन) संघाच्या फिटनेस ट्रेनर (स्ट्रेंथ ॲण्ड कंडिशन फिटनेस प्रशिक्षक) पदीे निवड झाली आहे.
दुलीप ट्राॅफी स्पर्धेसाठी देशातील पुर्व विभाग, पश्चिम विभाग, उत्तर विभाग, दक्षिण विभाग, मध्य विभाग व उत्तर पुर्व विभाग या सहा विभागीय संघात खेळविली जाते. या स्पर्धेत भारतातील सर्व नामवंत खेळाडूंचा समावेश असतो. स्पर्धा दि.२८ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर २०२५ या कालावधीत बेंगलोर येथे खेळविणेत येणार आहे. या स्पर्धेतील पश्चिम विभाग या संघाच्या फिटनेस ट्रेनरपदीे महेश पाटील यांना काम करण्याची संधी प्रथमच मिळाली आहे. त्यामुळे कोल्हापूरसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. महेश पाटील हे कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे माजी खेळाडू असून गेली दोन वर्षे ते महाराष्ट्र रणजी ट्राॅफी संघाच्या सपोर्ट स्टाफ पदी कार्यरत आहेत.
महेश पाटीलची दुलीप ट्राॅफीसाठी पश्चिम विभाग संघाच्या फिटनेस ट्रेनरपदी निवड
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
24
°
C
24
°
24
°
38 %
0kmh
0 %
Tue
28
°
Wed
28
°
Thu
29
°
Fri
27
°
Sat
27
°

