कोल्हापूर :
जोतिबा डोंगरावर तिसऱ्या श्रावणी सोमवारी नगरप्रदक्षिणा – नगरदिंडी सोहळा भक्तीमय व उत्साहात पार पडला. अनेक भाविक टाळ-मृदुंग वाजवत तर काही खांद्यावर भगवा झेंडा घेऊन सहभागी झाले होते. अधूनमधून कोसळणाऱ्या श्रावण सरी आणि धुकं अशा वातावरणात सुरू झालेल्या या नगरप्रदक्षिणेत हजारो भाविक सहभागी झाले होते. या भाविकांना सहजसेवा ट्रस्टततर्फे उपवासाच्या फराळाचे वाटप करण्यात आले.
धार्मिकदृष्ट्या श्रावण महिन्याला विशेष महत्व आहे. श्रावण महिना म्हणजे भक्तांसाठी परमेश्वराची आराधना करण्याचा विशेष काळ. या महिन्यात येणाऱ्या प्रत्येक सोमवारला विशेष महत्त्व असते. तिसऱ्या श्रावण सोमवारी, कोल्हापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र जोतिबा डोंगर येथे नगर प्रदक्षिणेचा अभूतपूर्व सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात पार पडला. शेकडो वर्षांची ही परंपरा जपण्यासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यासह इतर भागांमधून ५० हजारहून अधिक भाविक सहभागी झाले होते. या प्रदक्षिणेत सहभागी होणारे भक्तगण कोणताही त्रास न बाळगता पायी चालत २५ किलोमीटरचे अंतर पूर्ण करतात.
प्रदक्षिणेचा मार्ग खडकाळ, चिखलाचा आणि दगडगोट्यांनी भरलेला असूनही, या भक्तांच्या चेहऱ्यावर कोणताही थकवा किंवा वेदना दिसत नाहीत. अनवाणी पायाने चालत असतानाही, केवळ आपल्या आराध्य दैवतावरील अतूट श्रद्धा आणि भक्तीच्या बळावर ते ही खडतर वाटचाल पूर्ण करतात. यात अबालवृद्धांचा सहभाग लक्षणीय असतो. या भक्तांची सेवा करण्याचे महत्त्वाचे काम गेल्या २५ वर्षांपासून सहजसेवा ट्रस्ट करत आहे. सहजसेवा ट्रस्टच्यावतीने प्रदक्षिणेत सहभागी झालेल्या भाविकांसाठी उपवासाच्या फराळाचे वाटप केले. यामध्ये साबुदाणा खिचडी, केळी, चहा आणि पिण्याचे पाणी यांचा समावेश होता. भक्तांना ऊर्जा मिळावी आणि त्यांची यात्रा सुखकर व्हावी, यासाठी सहजसेवा ट्रस्टचे कार्यकर्ते मोठ्या तळमळीने सेवा देत होते. त्यांच्या या कार्यामुळे अनेक भाविकांना दिलासा मिळाला.
नगरप्रदक्षिणेतील भाविकांना सहजसेवा ट्रस्टततर्फे उपवासाच्या फराळाचे वाटप
RELATED ARTICLES
Mumbai
overcast clouds
26
°
C
26
°
26
°
89 %
5.8kmh
100 %
Sat
27
°
Sun
28
°
Mon
27
°
Tue
27
°
Wed
27
°