Homeसण - उत्सवश्री अंबाबाई मूर्तीची दि.११ व १२ ऑगस्ट रोजी संवर्धन प्रक्रिया

श्री अंबाबाई मूर्तीची दि.११ व १२ ऑगस्ट रोजी संवर्धन प्रक्रिया

• भाविकांसाठी कलश व उत्सवमूर्तीच्या दर्शनाची व्यवस्था
कोल्हापूर :
करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी – अंबाबाई देवीच्या मूर्तीची संवर्धन प्रक्रिया सोमवार दि. ११ व मंगळवार दि. १२ ऑगस्ट २०२५ रोजी सुरु राहणार आहे. या दोन दिवसांच्या कालावधीत भाविकांना देवीच्या मूळ मूर्तीचे दर्शन होणार नाही. त्यामुळे कलश व उत्सवमूर्ती पितळी उंबऱ्याच्या आतमध्ये ठेवून भाविकांना योग्य पद्धतीने दर्शनाची सोय पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्यावतीने करण्यात येणार आहे.
श्री करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीची मूर्ती सुस्थितीत राहणेच्या अनुषंगाने, जिल्हाधिकारी कोल्हापूर तथा प्रशासक देवस्थान व्यवस्थापन समिती, पश्चिम महाराष्ट्र, कोल्हापूर यांच्यावतीने मूर्तीची पाहणी करणेकामी वेळोवेळी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण नवी दिल्ली (भारत सरकार) यांना कळविणेत आले होते. त्यानुसार भारतीय पुरातत्व सर्वेक्षण नवी दिल्ली यांचेकडून मूर्तीची पाहणी व संवर्धन १६ एप्रिल २०२४ मध्ये करण्यात आले होते. त्यावेळेच्या सुचनेनुसार देवस्थान व्यवस्थापन समितीच्यावतीने याबाबतचे पत्र दि. १२ जून रोजी महासंचालक भारतीय पुरातत्व विभाग नवी दिल्ली (भारत सरकार) यांना मूर्तीचे नियमित पाहणी व आवश्यक संवर्धन प्रक्रिया करणेबाबत कळवले होते. त्यानुसार भारतीय पुरातत्व विभाग यांचेवतीने श्री अंबाबाई देवीच्या मूर्तीची पाहणी व आवश्यक नियमित संवर्धन प्रक्रिया करण्यात येणार आहे.
त्यामुळे श्री अंबाबाई देवीच्या मूळ मूर्तीचे दर्शन सोमवारी (दि. ११) आणि मंगळवारी (दि. १२) भाविकांना घेता येणार नाही, या कालावधीमध्ये भाविकांना श्रीं ची उत्सवमूर्ती व श्रीकलश दर्शनासाठी ठेवणेत येणार असून, भाविकांनी पितळी उंबऱ्याच्या बाहेरुन श्रीकलश व श्रींच्या उत्सवमूर्तीचे दर्शन घेऊन, देवस्थान व्यवस्थापन समिती पश्चिम महाराष्ट्र, कोल्हापूर यांना सहकार्य करावे असे आवाहन समितीच्यावतीने करण्यात आले आहे.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
overcast clouds
26 ° C
26 °
26 °
89 %
5.8kmh
100 %
Sat
27 °
Sun
28 °
Mon
27 °
Tue
27 °
Wed
27 °

Most Popular

You cannot copy content of this page