कोल्हापूर :
शिवाजी विद्यापीठाच्या भूगोल अधिविभागाच्या विस्तार इमारतीचे उदघाटन कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत विभागाच्या विद्यार्थिनींच्या हस्ते करण्यात आले.
भूगोल अधिविभागात नव्याने सुरू करण्यात आलेल्या जिओइन्फॉर्मेटिक्स अभ्यासक्रमांसाठी जागेची आवश्यकता लक्षात घेऊन गतवर्षी ऑक्टोबरमध्ये नूतन विस्तार इमारतीच्या कामास प्रारंभ करण्यात आला. एक वर्ष पूर्ण होण्याच्या आत इमारतीचे उदघाटन करण्यात आले आहे. ४०७७ चौरस फूट (३७८.९६ चौ. मीटर) इतके तळमजल्याचे बांधकाम झाले आहे. जेनेसिस डिझाईनर्स प्रा. लि. हे आर्किटेक्ट आहेत.
मंगळवारी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते कोनशिला अनावरण नियोजित होते. तथापि, जिओइन्फॉर्मेटिक्स विषयाच्या सायली यादव आणि निकिता जाधव या विद्यार्थिनींना बोलावून कुलगुरूंनी त्यांच्या हस्ते कोनशिला अनावरण केले. त्यानंतर कुलगुरू डॉ. शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. पाटील यांनी इमारतीमध्ये फीत सोडवून प्रवेश केला.
यावेळी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी जाधव, डॉ. गिरीष कुलकर्णी, उपकुलसचिव रणजीत यादव, भूगोल अधिविभाग प्रमुख डॉ. सचिन पन्हाळकर, डॉ. संभाजी शिंदे, डॉ. धनश्री शिंदे, डॉ. मीना पोतदार, डॉ. विद्या चौगुले, डॉ. प्रशांत पाटील, विद्युत अभियंता अमित कांबळे, विजय पोवार, शिवकुमार ध्याडे, वैभव आरडेकर, जी. बी. मस्ती यांच्यासह भूगोल अधिविभागातील शिक्षक, प्रशासकीय सेवक, विद्यार्थी-विद्यार्थिनी, अभियांत्रिकी विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
——————————————————-
भूगोल अधिविभागाच्या विस्तार इमारतीचे विद्यार्थिनींच्या हस्ते उदघाटन
RELATED ARTICLES
Mumbai
scattered clouds
27
°
C
27
°
27
°
83 %
5.5kmh
41 %
Sat
27
°
Sun
27
°
Mon
27
°
Tue
27
°
Wed
27
°