Homeशैक्षणिक - उद्योग शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांचा शुक्रवारी ३८वा स्मृतिदिन

शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांचा शुक्रवारी ३८वा स्मृतिदिन

कोल्हापूर : 
‘ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यांसाठी शिक्षणप्रसार’ या उदात्त हेतूने प्रेरित होऊन शिक्षणाची गंगा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवून बहुजन समाजाला शिक्षण प्रवाहात आणणारे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संकल्पक, संस्थापक, संवर्धक, ज्ञानतपस्वी, ध्येयवादी  समाजशिक्षक आणि द्रष्टे समाजचिंतक शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांचा ३८वा स्मृतिदिन शुक्रवार (दि.८) सकाळी १०:३० वाजता संस्थेच्या शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्मृतिभवन येथे संपन्न होत आहे.
या समारंभासाठी प्रमुख पाहुणे ना. पंकज भोयर (राज्यमंत्री, शालेय शिक्षण, गृह (ग्रामीण), सहकार, खनिकर्म, गृहनिर्माण) हे आहेत. प्रमुख वक्ते म्हणून सुप्रसिध्द कवी व व्याख्याते अविनाश भारती हे आहेत. ते ‘आजची संस्कृती व डॉ. बापूजी साळुंखे यांची विचारधारा’ या विषयावर विचार मांडणार आहेत. संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांचे अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न होत आहे.
या कार्यक्रमास संस्था सेक्रेटरी प्राचार्या सौ. शुभांगी गावडे, संस्थेचे सहसचिव (प्रशासन) एस. एम. गवळी, संस्थेचे सहसचिव (अर्थ) प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे, संस्थेचे आजी-माजी पदाधिकारी व १३ जिल्हयातील ४१० शाखांमधून बहुसंख्य गुरुदेव कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी संस्थेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. दुपारच्या सत्रात मुख्याध्यापकांसाठी चर्चासत्राचे आयोजन करणेत आले आहे.
कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजन, संस्था प्रार्थना व महेश हिरेमठ यांच्या सुमधुर गायनाने होईल. या कार्यक्रमासाठी शिक्षणप्रेमी, अभ्यासक, विचारवंत, गुरुदेव कार्यकर्ते व विद्यार्थी यांनी आवर्जून उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्था कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी केले आहे

RELATED ARTICLES
Mumbai
overcast clouds
26 ° C
26 °
26 °
89 %
5.8kmh
100 %
Sat
27 °
Sun
28 °
Mon
27 °
Tue
27 °
Wed
27 °

Most Popular

You cannot copy content of this page