• राष्ट्रवादीच्या बैठकीत कार्यकर्त्यांची आग्रही भूमिका
कोल्हापूर :
मंत्री हसन मुश्रीफ यांनी केडीसीसी अर्थात कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणार आहे, असे सुतोवाच केले आहे. परंतु; मंत्री श्री. मुश्रीफ यांना केडीसीसी बँकेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊ देणार नाही, अशी आग्रही भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली.
कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत या विषयावर चर्चा झाली. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील -आसुर्लेकर होते.
बैठकीत बोलताना माजी आमदार के. पी. पाटील म्हणाले, मंत्री हसन मुश्रीफ हे सर्वसामान्य गोरगरीब शेतकऱ्यांचे नेतृत्व आहे. केडीसीसी बँकेच्या कारभाराच्या माध्यमातून त्यांनी शेतकरी कल्याणाचा ध्यास सातत्याने घेतला आहे. बँकेच्या माध्यमातून शेतकरी कल्याणाच्या विविध योजना व धोरणे राबवून त्यांनी संबंध जिल्ह्यातील शेतकऱ्यांना स्थैर्य मिळवून दिले आहे.
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील- आसुर्लेकर म्हणाले, दहा वर्षाच्या आधी बँकेवर सहा वर्ष प्रशासक होते. अलीकडच्या दहा वर्षात संचालक मंडळाची सत्ता आहे. या कारकिर्दीत मंत्री श्री. मुश्रीफ यांनी बँक नावारूपाला आणली आहे.
यावेळी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी केडीसीसी बँक व हसन मुश्रीफ यांच्या अनुषंगाने आपल्या भावना व्यक्त केल्या. या बैठकीला राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष अनिलराव साळोखे, महिला जिल्हाध्यक्षा सौ. शितलताई फराकटे, शिरोळचे माजी नगराध्यक्ष अमरसिंह माने- पाटील, बाळासाहेब देशमुख, नितीन दिंडे, हर्षवर्धन चव्हाण, संभाजीराव पवार, विश्वनाथ कुंभार, आप्पासाहेब धनवडे, शिरीष देसाई, विकासराव पाटील, सुनील भिऊंगडे, विनय पाटील, भिकाजी एकल, हर्षवर्धन चव्हाण, संतोष धुमाळ, गणी ताम्हणकर, निहाल कलावंत, युवराज पाटील, दाजी पाटील, अर्जुन चौगुले आदी उपस्थित होते.
हसन मुश्रीफ यांना केडीसीसी अध्यक्षपदाचा राजीनामा देऊ देणार नाही
Mumbai
mist
28
°
C
28
°
27.9
°
83 %
5.1kmh
75 %
Wed
28
°
Thu
28
°
Fri
28
°
Sat
28
°
Sun
28
°