Homeराजकियभाजपा उत्तरेश्वर मंडलमध्ये ५१ रक्तदात्यांचे रक्तदान

भाजपा उत्तरेश्वर मंडलमध्ये ५१ रक्तदात्यांचे रक्तदान

कोल्हापूर :
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रभर महा रक्तदान संकल्प करण्यात आला होता. त्यानिमित्त मंगळवारी भाजपा उत्तरेश्वर मंडलमध्ये या रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यामध्ये ५१ रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाढदिवसानिमित्त कोणतेही बॅनर लावून जाहिरातीचा मोठा गाजावाजा न करता, मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये शुभेच्छारुपी आपले योगदान द्यावे व समाज उपयोगी उपक्रम राबवण्यात यावा, असे आवाहन केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत भाजपा उत्तरेश्वर मंडलमध्ये रक्तदान शिबिर पार पडले. या शिबिरात ५१ रक्तदात्यांनी रक्तदान करून सहभाग नोंदवला.
यावेळी उत्तरेश्वर मंडल अध्यक्ष सुनील पाटील, भरत काळे, अमेय भालकर, सुशांत पाटील, विराज चिखलीकर, अमित संकपाळ, राजू माने, श्रीकांत पाटील, संदीप पाटील, विशाल शिराळे, राहुल घाटगे, चेतन शिंगटे, दिग्विजय कालेकर, सुशांत मुधाळे, अजित मुळीक यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
scattered clouds
28 ° C
28 °
28 °
82 %
8.7kmh
47 %
Thu
28 °
Fri
28 °
Sat
28 °
Sun
29 °
Mon
29 °

Most Popular

You cannot copy content of this page