कोल्हापूर :
२६ वर्षांची आयुर्वेद परंपरा असलेल्या कांकायन फाउंडेशनतर्फे गुडघेदुखी उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दि. ५, ६ व ७ ऑगस्ट २०२५ रोजी कांकायन आयुर्वेद हॉस्पिटल कोल्हापूर येथे हे शिबीर होणार आहे.
गुडघा दुखणे, गुडघा सुजणे, गुडघ्यातून कटकट, करकर आवाज येणे, हाडांची झीज होणे, मेनिस्कस टियर, गुडघ्यात पाणी होणे, जिना चढताना किंवा उतरताना गुडघा दुखणे, गुडघ्यातील वंगण कमी होणे, बसता-उठता गुडघा आणि कंबर दुखणे, संधिवात, आमवात, गाऊट, चिकनगुनियामुळे गुडघा दुखणे अशाप्रकारचा गुडघ्याचा त्रास असणाऱ्या पेशंटनी या शिबिराचा लाभ घ्यावा. नाव नोंदणीसाठी ८४८५००९०५१ या नंबरवर किंवा कांकायन आयुर्वेद हॉस्पिटल व्हिनस कॉर्नर, कोल्हापूर येथे संपर्क साधावा, असे आवाहन कांकायन फाउंडेशनतर्फे करण्यात आले आहे.
यासाठी नाव नोंदणी केलेल्या पहिल्या १०० पेशंटची तपासणी मोफत केली जाणार आहे. तसेच अग्निकर्म, विद्धकर्म सारखे उपचार मोफत केले जाणार आहे. लेपाचे औषध आणि इतर औषधे सवलतीच्या दरात दिले जाणार आहेत.
शिबिरात डॉ. दिलखुष एम. तांबोळी (एम. डी. आयुर्वेद गोल्डमेडल) व डॉ. सौ. वहिदा दि. तांबोळी (एम. डी. आयुर्वेद) व त्यांचे सहकारी पेशंट तपासणार आहेत.
——————————————————-
कांकायन फाउंडेशनतर्फे गुडघेदुखी उपचार शिबीर
Mumbai
scattered clouds
28
°
C
28
°
28
°
82 %
8.7kmh
47 %
Thu
28
°
Fri
28
°
Sat
28
°
Sun
29
°
Mon
29
°