कोल्हापूर :
महिंद्रा ट्रक अँड बस बिझनेस (एमटीबी) या महिंद्रा समूहाचा भाग असलेल्या कंपनीने महिंद्रा फ्युरियो-८ लाँच करत असल्याचे जाहीर केले आहे. ही आधुनिक, हलक्या कमर्शियल ट्रक्सची श्रेणी असून त्यावर ‘सर्वाधिक मायलेज मिळवा, अन्यथा ट्रक परत द्या’ अशी अनोखी हमी देण्यात येत आहे.
चाकण, महाराष्ट्र येथे महिंद्राच्या जागतिक दर्जाच्या उत्पादन कारखान्यात तयार करण्यात आलेल्या महिंद्रा फ्युरियो-८ मध्ये ४ टायर्स कार्गो आणि ६ टायर्स कार्गो हे दोन व्हेरिएंट्स देण्यात आले आहेत. यामुळे एलसीव्ही विभागातील ग्राहकांच्या वैविध्यपूर्ण व्यवसायासाठी मदत होईल. फ्युरियो-८ मध्ये सर्वोत्तम मायलेज, अधिक पेलोड क्षमता आणि आरामदायीपणा, सोयीस्करपणा व सुरक्षेसह अत्याधुनिक केबिन देण्यात आली आहे. ही वैशिष्ट्ये लक्षात घेता फ्युरियो-८ या श्रेणीत सर्वोच्च नफा मिळवून देण्यासाठी तयार करण्यात आली आहे. म्हणूनच ‘ट्रक बदलो, तकदीर बदलेगी’ असा दावा करण्यात आला आहे.
नवी श्रेणी सादर करताना विनोद सहाय, अध्यक्ष – ट्रक्स, बसेस, सीई, एयरोस्पेस आणि डिफेन्स, ग्रुप एक्झक्युटिव्ह बोर्डचे सदस्य, महिंद्रा ग्रुप म्हणाले की, नवीन महिंद्रा फ्युरो-८ या एलसीव्ही ट्रक्सच्या श्रेणीवर ‘सर्वाधिक मायलेज मिळवा, अन्यथा ट्रक परत द्या’ अशाप्रकारची हमी देण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांना फ्युरियो-८ सह सर्वाधिक नफा मिळवण्यास मदत होणार आहे. नवीन ट्रकची ही श्रेणी गुणवत्ता आणि ग्राहकाभिमुखतेचे मापदंड प्रस्थापित करणारी व पर्यायाने या विभागाप्रती आमची बांधिलकी तसेच आमच्या उत्पादनांवरील विश्वास दर्शवणारी आहे
महिंद्रा फ्युरियो-८ लाँच
RELATED ARTICLES
Mumbai
overcast clouds
28.3
°
C
28.3
°
28.3
°
79 %
6.7kmh
98 %
Fri
28
°
Sat
28
°
Sun
29
°
Mon
28
°
Tue
28
°