कोल्हापूर :
भारत सरकारच्या शिक्षण विभागामार्फत इको क्लब फॉर मिशन लाईफ या अभियानांतर्गत येथील विवेकानंद ज्युनिअर कॉलेजमध्ये इको क्लबची स्थापना करण्यात आली.
या इको क्लबच्यावतीने एक पेड मॉ के नाम या शासनाच्या उपक्रमांतर्गत वन महोत्सवानिमित २५ रोपांचे वितरण विद्यार्थ्यांना करुन सदरचे रोप आपल्या आईसोबत लावतानाचा सेल्फी काढून पाठवण्याचे आवाहन करण्यात आले. सेल्फी पाठविल्यानंतर विद्यार्थ्यांना डिजिटल प्रमाणपत्र देणेत येणार आहे. हा उपक्रम सर्व विद्यार्थ्यांकडून राबविण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांमध्ये निरोगी जीवनशैली टिकवून ठेवणे, शाश्वत अन्नप्रणालीचा अवलंब करणे, ई कचरा कमी करणे, कचरा कमी करणे, उर्जेची व पाण्याची बचत करणे, प्लॅस्टिकचा वापर टाळणे इत्यादीची समाजात जागृती करणे हा इको क्लबचा उद्देश आहे.
या समितीमध्ये इको क्लबचे प्रमुख म्हणून प्रा. एच. जी. पाटील हे काम पाहणार असून सदस्य म्हणून २४ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. या इको क्लबव्दारे पर्यावरणाबाबत कार्यशाळा, प्रकल्प्, प्रदर्शन, स्वच्छता अभियान, विविध स्पर्धा, निसर्ग सहल, उन्हाळी सुट्टीतील उपक्रम राबविले जाणार आहेत.
या क्लबची स्थापना विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यावेळी प्रा. एस. पी. थोरात, प्रा. सौ. शिल्पा भोसले, प्रा. एम. आर. नवले, प्रा. एस. टी. शिंदे, प्रा. बी. एस. कोळी, प्रा. गीतांजली साळुंखे, पर्यावरण विभागप्रमुख प्रा. हेमंत पाटील, डॉ.अभिजीत पाटील, रजिस्ट्रार एस. के. धनवडे प्राध्यापक, विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.
——————————————————-
विवेकानंद कॉलेजमध्ये ‘इको’ क्लबची स्थापना
RELATED ARTICLES
Mumbai
overcast clouds
26.1
°
C
26.1
°
26.1
°
88 %
5kmh
100 %
Sat
27
°
Sun
28
°
Mon
27
°
Tue
27
°
Wed
27
°