Homeकला - क्रीडाऑलिंपिक पात्रतेच्या आव्हानासाठी भारतीय सायकलपटू सज्ज

ऑलिंपिक पात्रतेच्या आव्हानासाठी भारतीय सायकलपटू सज्ज

• बजाज पुणे ग्रँड टूर २०२६ सायकल शर्यत उद्यापासून
कोल्हापूर :
भारतात प्रथमच होणाऱ्या बजाज पुणे ग्रँड टूर २०२६ या पहिल्याच यूसीआय २.२ क्वान्टिनेन्टल सायकलिंग रोड रेससाठी भारतीय सायकलपटू सज्ज झाले आहेत. या शर्यतीच्या निमित्ताने आंतरराष्ट्रीय स्तरावर तसेच, ऑलिंपिकसाठी पात्र ठरण्याचे आव्हान पार करण्याची संधी भारतीय सायकलपटूंना मिळणार आहे. त्याचवेळी एक आगळावेगळा अनुभव आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंबरोबर स्पर्धा करण्याची संधी अशी दुहेरी सुवर्ण संधी त्यांना मिळणार आहे.
१९ ते २३ जानेवारी २०२६ या पाच दिवस चालणाऱ्या या शर्यतीत विशेष करून भारतीय सायकलपटूंसाठी या स्पर्धेच्या कामगिरीच्या जोरावर ऑलिंपिक पात्रतेकरता बहुमोल गुणांची कमाई करण्याची संधी असणार आहे.
भारतात प्रथमच होणाऱ्या युसीआय प्राधिकृत रोड रेससाठी १२ भारतीय सायकलपटू सहभागी होत आहे. मायदेशी होत असलेल्या या स्पर्धेत भारतीय सायकलपटूंच्या दोन संघांमध्ये विभागल्या जाणाऱ्या या पथकाला पूर्वतयारी आणि अपेक्षा अशा दोन्ही आव्हानांना तोंड द्यावा लागणार आहे. यानिमित्ताने झालेल्या पत्रकार परिषदेत भारताचा राष्ट्रीय सायकलिंग संघ आणि भारतीय क्रीडा विकास संघ यातील सदस्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी भारतीय सायकलिंग महासंघाचे महासचिव मनिंदरपाल सिंग यांच्यासह भारतीय सायकलिंग संघाचे मुख्य  प्रशिक्षक मॅक्सत अयाजबायेव्ह आणि सहप्रशिक्षक जोगिंदर सिंग उपस्थित होते.  त्यांच्यासह राष्ट्रीय संघातील सदस्य  हर्षवीर सिंग सेखोन, विश्वजीत सिंग, सूर्य थत्तू आणि भारतीय विकास संघातील सदस्य अक्षर त्यागी, मानव सारडा हेही यावेळी उपस्थित होते.
यावेळी भारतीय सायकलिंग महासंघाचे महासचिव मनिंदरपाल सिंग म्हणाले की, भारतीय सायकलिंग क्षेत्रासाठी बजाज पुणे ग्रँड टूर हा एक मैलाचा दगड ठरणार आहे. विविध टप्प्यांमध्ये चालणाऱ्या युसीआय २.२ स्पर्धेचे यजमानपद मिळवणे सोपे नव्हते. मात्र, भारतीय सायकलिंग महासंघाने गेल्या अनेक वर्षांपासून केलेल्या अथक प्रयत्नांमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर आम्हाला मिळणारी विश्वासार्हता याबाबतीत निर्णय ठरली. या स्पर्धेमुळे भारतीय सायकलपटूंसाठी ऑलिम्पिकचे दरवाजे उघडणार आहेत. सायकलिंग या खेळाकडे शासन प्रायोजक आणि गुंतवणूकदार कशाप्रकारे पाहतात हे सुद्धा सिद्ध होणार आहे.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
haze
23 ° C
23 °
23 °
73 %
1.5kmh
5 %
Sun
24 °
Mon
24 °
Tue
25 °
Wed
26 °
Thu
25 °

Most Popular

You cannot copy content of this page