Homeराजकियराजर्षी शाहू आघाडीचा वचननामा प्रसिद्ध

राजर्षी शाहू आघाडीचा वचननामा प्रसिद्ध

कोल्हापूर :
कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी राजर्षी शाहू आघाडी प्रणित राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष), वंचित बहुजन आघाडी, आम आदमी पार्टी यांचा संयुक्तिक वचननामा शनिवारी प्रसिद्ध करण्यात आला.
राजर्षी शाहू स्मारक भवन येथील प्रेस हॉलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, आम आदमी पार्टी महाराष्ट्रचे राज्य घटक संदीप देसाई, वंचित बहुजन आघाडी कोल्हापूर महानगर अध्यक्ष अरुण सोनवणे व इतर पदाधिकारी यांच्या उपस्थितीत राजर्षी शाहू आघाडीचा वचननामा प्रसिद्ध करण्यात आला.
प्रसिद्ध करण्यात आलेल्या वचननाम्यात प्रामुख्याने कोल्हापूरातील अंतर्गत रस्ते १००% सुस्थितीत करणे, वाहतुक व शहर सुरक्षा व्यवस्था तसेच पार्किंगच्या सुविधा उपलब्ध करणे, फेरीवाले झोन फेर सर्वेक्षण, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था केएमटी अधिक सक्षम बनविणे, पाण्याची अनियमतता यावर अभ्यास करून पूर्ण क्षमतेने स्वच्छ व मुबलक पाणी दिले जाईल. महानगरपालिकेच्या शाळा अद्यावत करून २ शाळा स्पोर्टस स्कूल म्हणून विकसीत करणे, शाळा कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष केएमटी बस उपलब्ध करुन देणे, प्रभागनिहाय दवाखाने सुरू करून तज्ञ डॉक्टरांची सेवा आणि औषधोपचार, महापालिकेच्या बागांसाठी विशेष निधी उपलब्ध करून बागा विकसीत करणे, महिलांसाठी स्वच्छतागृह उभी केली जातील. तसेच पर्यटकांसाठी अत्याधुनिक टॉयलेट बाथरूमची व्यवस्था केली जाईल. घरफाळ्यामध्ये सुसुत्रता आणणे, हद्दवाढीला प्राधान्य दिले जाईल अशा अनेक मुद्यांना प्राधान्य दिले आहे. वचननाम्यात एकूण २५ कलमे आहेत.

RELATED ARTICLES
Mumbai
clear sky
25.2 ° C
25.2 °
25.2 °
62 %
5.2kmh
0 %
Sun
25 °
Mon
27 °
Tue
27 °
Wed
26 °
Thu
26 °

Most Popular

You cannot copy content of this page