• खा. धैर्यशील माने यांच्या पाठपुराव्याला यश
कोल्हापूर :
हातकणंगले व शिराळा तालुक्यातील ग्रामीण रस्ते व पुलांच्या पायाभूत सुविधांना मोठा दिलासा देणारी मंजुरी मिळाली असून केंद्र सरकारच्या नाबार्ड योजनेअंतर्गत ग्रामीण पायाभूत सुविधा विकास निधीतून एकूण १६ कोटी ५० लाख रुपयांची कामे मंजूर झाली आहेत. खासदार धैर्यशील माने यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या महत्त्वाकांक्षी विकासकामांना हिरवा कंदील मिळाला आहे.
हातकणंगले तालुक्यातील प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक ९६ व १०२ तसेच सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील प्रमुख व इतर जिल्हा मार्गांवरील वाहतूक अडथळे दूर करण्यासाठी ही कामे उपयुक्त ठरणार आहेत. यामध्ये मौजे तासगाव ते मौजे वडगाव या प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक ९६ रस्त्याची रुंदीकरणासह सुधारणा करण्यासाठी ४ कोटी ५० लाख रुपये मंजूर झाले आहेत. तसेच याच मार्गावरील निलेवाडी-पारगाव रस्त्यावर जुने पारगाव गावाजवळ लहान पुलाच्या बांधकामासाठी १ कोटी ५० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
याशिवाय, हातकणंगले तालुक्यातील प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक १०२ (तारदाळ ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६) या रस्त्याच्या रुंदीकरण व सुधारणेसाठी ५ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक १११ वर शिरशी गावाजवळ लहान पुलासाठी २ कोटी ५० लाख रुपये, तर इतर जिल्हा मार्ग क्रमांक ११ वर रिळे गावाजवळ लहान पुलासाठी ३ कोटी रुपये मंजूर झाले आहेत.
या सर्व कामांमुळे ग्रामीण भागातील दळणवळण अधिक सुरक्षित व वेगवान होणार असून शेतकरी, विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. विकासासाठी केंद्र व राज्य स्तरावर प्रभावी समन्वय साधत निधी मंजूर करून आणल्याबद्दल खासदार धैर्यशील माने यांच्या प्रयत्नांचे सर्वत्र स्वागत होत आहे.
ग्रामीण पायाभूत सुविधा विकास निधीतून एकूण १६ कोटी ५० लाख रुपयांची कामे मंजूर
Mumbai
clear sky
25.2
°
C
25.2
°
25.2
°
62 %
5.2kmh
0 %
Sun
25
°
Mon
27
°
Tue
27
°
Wed
26
°
Thu
26
°

