कोल्हापूर :
प्रमाने महा सिक्योरटेक एक्स्पो -२०२५ च्या दुसऱ्या आवृत्तीत कोल्हापूर येथे त्यांच्या नवीनतम व्हिडिओ सुरक्षा उत्पादनांची आणि व्हर्टिकल सोल्यूशन्सची श्रेणी प्रदर्शित केली. नवीनतम उत्पादने आणि सोल्यूशन्स प्रमा बूथवर प्रदर्शित करण्यात आले होते.
महा सिक्योरटेक एक्स्पोच्या दुसऱ्या आवृत्तीचे उदघाटन आमदार अमल महाडिक यांनी कोल्हापूरातील रामकृष्ण लॉन्स येथे केले. याप्रसंगी एसजी ग्रुपचे अध्यक्ष संजय घोडावत यांची उपस्थिती होती. कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या जवळच्या भागातील इकोसिस्टम भागीदारांकडून या प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळाला.
महा सिक्युअरटेक एक्स्पोच्या दुसऱ्या आवृत्तीबद्दल बोलताना, प्रमा इंडियाचे प्रवक्ते म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रात जलद गतीने होणाऱ्या विकासकामांमुळे आणि चालू प्रकल्पांमुळे प्रादेशिक भौतिक सुरक्षा बाजारपेठ वाढत आहे. प्रमा हा या प्रादेशिक विकास कथेचा अविभाज्य भाग आहे. आम्ही भारताच्या विशिष्ट गरजांनुसार योग्य असलेल्या प्रगत तंत्रज्ञानाचा अवलंब करून आमच्या स्वदेशी उत्पादन रोडमॅपचे अनुसरण करत आहोत.
ते पुढे म्हणाले की, आम्ही नवीनतम आयपी आणि ॲनालॉग एचडी व्हिडिओ सुरक्षा कॅमेरे, नॉन-सीसीटीव्ही सुरक्षा उत्पादने (व्हिडिओ डोअर फोन, फेस रेकग्निशन टर्मिनल्स आणि सोल्यूशन्स) प्रदर्शित केली. दुसऱ्या आवृत्तीतील महा सिक्युअरटेक एक्स्पोला मिळालेला उत्तम प्रतिसाद हा इकोसिस्टम भागीदारांसाठी आणि संपूर्ण सुरक्षा उद्योगासाठी एक चांगला संकेत आहे. आम्ही सिस्टम इंटिग्रेटर्स, डीलर्स आणि वितरकांमध्ये उत्पादन जागरूकता निर्माण करून भागीदारांना सक्षम बनवत आहोत.
प्रमाकडून नवीनतम व्हिडिओ सुरक्षा उत्पादने आणि सोल्युशन्स प्रदर्शित
RELATED ARTICLES
Mumbai
broken clouds
25.3
°
C
25.3
°
25.3
°
38 %
2.8kmh
64 %
Sun
27
°
Mon
26
°
Tue
26
°
Wed
26
°
Thu
26
°

