Homeकला - क्रीडाकोल्हापूर जिल्हा खुल्या अमॅच्युर निवड बुद्धिबळ स्पर्धेत शौर्य बगडिया अजिंक्य

कोल्हापूर जिल्हा खुल्या अमॅच्युर निवड बुद्धिबळ स्पर्धेत शौर्य बगडिया अजिंक्य

• व्यंकटेश खाडे-पाटील उपविजेता तर  अर्णव पोर्लेकर तृतीय
कोल्हापूर :
चेस असोसिएशन कोल्हापूर आयोजित कोल्हापूर जिल्हा खुल्या अमॅच्युर निवड बुद्धिबळ स्पर्धेत अग्रमानांकित इचलकरंजीच्या शौर्य बगडीयाने ७ पैकी ६ गुण व ३१ टायब्रेक गुण मिळवून अजिंक्यपद पटकाविले.
अग्रमानांकित कोल्हापूरचा व्यंकटेश खाडे-पाटीलने ६ गुण व २९ टायब्रेक गुणासह उपविजेतेपद मिळविले तर दहावा मानांकित कोल्हापूरचा अर्णव पोर्लेकर ६ गुण व २८ टायब्रेक गुण घेत तृतीय स्थान निश्चित केले. तन्मय पवार (इचलकरंजी), प्रज्वल मुधाळे (हुपरी) व संस्कार काटकर (कोल्हापूर) हे तिघेजण साडेपाच गुण व सरस टायब्रेक गुणानुसार अनुक्रमे चौथ्या, पाचव्या व सहाव्यास्थानी आले. या सहा जणांची निवड रत्नागिरी येथे १६ ते १८ जानेवारी दरम्यान होणाऱ्या महाराष्ट्र राज्य खुल्या अमॅच्युर निवड आंतरराष्ट्रीय गुणांकन बुद्धिबळ स्पर्धेसाठी कोल्हापूर जिल्हा संघात झाली आहे.                                                                                      
स्विस लीग पद्धतीने एकूण सात फेऱ्यात घेण्यात आलेल्या या निवड स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्यातील नामांकित ७६ बुद्धिबळपटू सहभागी झाले होते. स्पर्धेचा बक्षीस समारंभ विनय ठक्कर व प्रियांका ढोले यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले, फिडे इन्स्ट्रक्टर मनिष मारुलकर, उपाध्यक्ष धीरज वैद्य, वरिष्ठ राष्ट्रीय पंच रोहित पोळ व विजय सलगर उपस्थित होते.
——————————————————-                                   

RELATED ARTICLES
Mumbai
clear sky
25.3 ° C
25.3 °
25.3 °
56 %
6.7kmh
0 %
Sun
25 °
Mon
26 °
Tue
26 °
Wed
26 °
Thu
26 °

Most Popular

You cannot copy content of this page