Homeकला - क्रीडावेस्ट झोन दिव्यांग टी-२० क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र व बडोदा संघाची विजयी सलामी

वेस्ट झोन दिव्यांग टी-२० क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र व बडोदा संघाची विजयी सलामी

कोल्हापूर :
दिव्यांग क्रिकेट असोसिएशन पुणे डिस्ट्रिक्ट, पुणे डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशन, ऑल महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन फॉर फिजिकली चॅलेंज्ड यांच्या संयुक्त विद्यमाने भारताचे माजी अष्टपैलू खेळाडू करसन घावरी यांच्या सन्मानार्थ आयोजित करसन घावरी चॅम्पियन करंडक वेस्ट झोन दिव्यांग टी-२० क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत महाराष्ट्र, बडोदा या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून विजयी सलामी दिली. या सामन्यात मोहसीन शेख (महाराष्ट्र संघ) व धर्मेंद्रसिंह झाला (बडोदा संघ) यांना सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.
सिंहगड इन्स्टिट्यूट, लोणावळा येथील क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत सलामीच्या लढतीत मोहसीन शेख( २-८ व नाबाद २७) याने केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर महाराष्ट्र संघाने सौराष्ट्र संघाचा ९ गडी राखून पराभव करत विजयी सलामी दिली. प्रथम फलंदाजी करताना महाराष्ट्र संघाच्या नितीन वाबळे (४-११), मोहसीन शेख (२-८), अनंता फटाळे (१-१३) यांनी केलेल्या अचूक माऱ्यापुढे सौराष्ट्र संघ १९.२ षटकात सर्वबाद ७८ धावावर कोसळला. यात कमलेश नैया २७, नरेंद्रसिंग गोहिल १५ यांनी थोडासा प्रतिकार केला.
सौराष्ट्र संघाचे हे आव्हान महाराष्ट्र संघाने ६.४ षटकात १ बाद ८२ धावा करून पूर्ण केले. यात कर्णधार सोमनाथ नलावडेने २२ चेंडूत ५ चौकार व २ षटकाराच्या मदतीने नाबाद ४० धावा काढून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. त्याला मोहसीन शेखने १० चेंडूत ५ चौकार व १ षटकाराच्या सहाय्याने नाबाद २७ धावा काढून साथ दिली.
याआधी स्पर्धेचे उदघाटन डॉ. एम. एस. गायकवाड सिंहगड एज्युकेशनल सोसायटीचे कॅम्पस संचालक उद्योजक शरद सावंत, सिंहगड बीएड कॉलेजचे प्राचार्य  डॉ. शिवाजी देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उद्योजक कृष्णा गावरस्कर, माजी दिव्यांग भारतीय खेळाडू राजू मुजावर आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
Mumbai
broken clouds
25.3 ° C
25.3 °
25.3 °
38 %
2.8kmh
64 %
Sun
27 °
Mon
26 °
Tue
26 °
Wed
26 °
Thu
26 °

Most Popular

You cannot copy content of this page