Homeइतरमहापालिका निवडणूक पारदर्शक आणि भयमुक्त होण्यासाठी तयारी करा

महापालिका निवडणूक पारदर्शक आणि भयमुक्त होण्यासाठी तयारी करा

मुख्य निवडणूक निरीक्षक शीतल तेली-उगले
कोल्हापूर :
निवडणुका निर्भय, पारदर्शक आणि बिनचूक पद्धतीने पार पाडण्यासाठी ठोस निर्देश देत प्रशिक्षणातून चांगली तयारी करावी अशा सूचना महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी नियुक्त मुख्य निवडणूक निरीक्षक शीतल तेली-उगले यांनी केल्या. त्या जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आलेल्या उच्चस्तरीय आढावा बैठकीत बोलत होत्या. यावेळी १५ जानेवारीला होणाऱ्या मतदान आणि दुसऱ्या दिवशी मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक टप्प्यात सखोल प्रशिक्षण आणि टीमवर्कवर विशेष भर देण्यात आला. यावेळी निविडणूक निरिक्षकांचे स्वागत जिल्हाधिकारी अमोल येडगे व प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी केले.
प्रभाग पद्धतीच्या या आव्हानात्मक निवडणुकीत मतदान आणि मतमोजणी पथकाला विशेष प्रशिक्षण देण्याचे निर्देश देण्यात आले, जेणेकरून कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष कामाची पुरेशी माहिती मिळेल आणि चुका टाळता येतील. प्रचारासाठी अवघे १० दिवसांचा कालावधी असल्याने वेळेचे काटेकोर नियोजन महत्त्वाचे असल्याचे सांगताना शीतल तेली-उगले यांनी सोशल मीडिया मॉनिटरिंग, खर्च मर्यादा पालन आणि पारदर्शक निवडणूक याबाबत सूचना दिल्या. मॉक पोल, मतदानाच्या शेवटच्या तासात होणारी गर्दी नियंत्रण आणि दस्तऐवजीकरण व्यवस्थित ठेवण्यावरही भर देण्यात आला. पुढील १५ दिवस अत्यंत महत्त्वाचे असून, सर्वांनी एकत्रितपणे काम करून निवडणूक प्रक्रिया भयमुक्त वातावरणात पार पाडावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी कायदा-सुव्यवस्थेसाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. चेकपोस्टवर मोठ्या वाहनांची काटेकोर तपासणी, पैसे-दारू रोखण्यासाठी कडक बंदोबस्त  आणि होमगार्ड-आरपीएफच्या मदतीने स्ट्राँग रूमची सुरक्षा यावर भर देण्यात आला. तत्पूर्वी निरीक्षकांनी क्षेत्रीय कार्यालये, मतदान केंद्रे आणि स्ट्राँग रूमची प्रत्यक्ष पाहणी करून तयारीचा आढावा घेतला.
बैठकीत अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांनी ईव्हीएम मशीन्स, स्ट्राँग रूम, मतदान केंद्रे, वाहतूक आराखडा आणि खर्च नियंत्रणाची सविस्तर माहिती सादर केली. मतदानासाठी लागणारी ईव्हीएम मशीन सीलची कार्यवाही ७-८ जानेवारीदरम्यान करण्यात येणार आहे.
प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी सर्व प्रक्रिया राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पार पाडल्या जातील असे आश्वासन देताना ६ जानेवारीला दुसरे प्रशिक्षण होणार असल्याचे सांगितले. उमेदवारांच्या माघारीनंतर भरारी पथके व नाक्यांवरील पथके पूर्ण कार्यक्षमतेने काम करतील. पुढील पंधरा दिवसामध्ये सोशल मिडीया, पेड न्युज यावर बारकाईने लक्ष केंद्रीत केले जाणार असल्याचे सांगितले.
गुरुवारी सकाळी ९:३० वाजता मुख्य निवडणूक निरीक्षक शीतल तेली-उगले यांनी शिये येथील नाका, शाहू नाका या ठिकाणी सुरु असलेल्या नाक्यांची प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. त्याचबरोबर एस्तरे पॅटर्न शाळा, उलपे मळा येथील छत्रपती शाहू विद्यालय या ठिकणी होणा-या मतदान केंद्रास भेट देऊन पाहणी केली. तर दसरा चौक व हॉकी स्टेडीयम येथील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयाची पाहणी केली.
या बैठकीला सहायक निरीक्षक गणेश निऱ्हाळी, अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, उप-आयुक्त परितोष कंकाळ, किरणकुमार धनवाडे, शहर अभियंता रमेश मस्कर, जल अभियंता हर्षजीत घाटगे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, पोलिस उपस्थित होते.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
broken clouds
25.3 ° C
25.3 °
25.3 °
38 %
2.8kmh
64 %
Sun
27 °
Mon
26 °
Tue
26 °
Wed
26 °
Thu
26 °

Most Popular

You cannot copy content of this page