• डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या २६६ विद्यार्थ्यांची आयआयटी बॉम्बेची ‘एडटेक इंटर्नशिप’ पूर्ण
कोल्हापूर :
प्रोजेक्ट बेस्ड लर्निंगमुळे विद्यार्थ्यांमध्ये सैद्धांतिक ज्ञानाबरोबरच प्रत्यक्ष समस्या सोडवण्याची क्षमता विकसित होते. त्यामुळे प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग हा विद्यार्थ्याना यशस्वी होण्याचा खात्रीशीर मार्ग असल्याचे प्रतिपादन आयआयटी बॉम्बेच्या शैक्षणिक तंत्रज्ञान केंद्राचे प्रा. रामकुमार राजेंद्रन यांनी केले. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या २६६ विद्यार्थ्यांनी आयआयटी बॉम्बेची ‘एडटेक इंटर्नशिप’ पूर्ण केल्याबद्दल आयोजित समारंभात ते बोलत होते. यावेळी संस्थाध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील आणि विश्वस्त ऋतुराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रा. रामकुमार राजेंद्रन, ‘एडटेक सोसायटी इंडिया’ चे इंटर्नशिप चेअर डॉ. अश्विन टी. एस. व डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे डॉ. कपिल कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आयआयटी बॉम्बेच्या ‘एज्युकेशनल डेटा अनालिसिस अँड एज्युकेशन अँप्लिकेशन डेव्हलपमेंट’ अभियानांतर्गत २६६ विद्यार्थ्यानी एकूण ८६ विविध प्रोजेक्टस यशस्वीरीत्या पूर्ण करून त्याचे पोस्टर प्रदर्शन डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये उत्साहात पार पडले. या विद्यार्थ्यांना प्रा. रामकुमार राजेंद्रन यांच्या हस्ते प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.
प्रा. रामकुमार राजेंद्रन म्हणाले की, जीवनातील आव्हानांवर काम करताना विद्यार्थ्यांची सर्जनशीलता, संशोधनवृत्ती व संघकार्य कौशल्ये अधिक बळकट होतात. अशा प्रकारचे शिक्षण विद्यार्थ्यांना उद्योगजगताच्या अपेक्षांसाठी सज्ज करते. त्यामुळे भविष्यातील यशासाठी प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग हा खात्रीशीर मार्ग आहे.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील म्हणाले, डी. वाय. पाटील समूह विद्यार्थ्यांना भविष्यासाठी सक्षम बनविण्यासाठी सातत्याने नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम राबवत आहे. प्रोजेक्ट बेस्ड लर्निंगमुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव मिळतो आणि त्यांचा आत्मविश्वास वाढतो. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थी उद्योगजगताशी थेट जोडले जातात.
विश्वस्त ऋतुराज पाटील म्हणाले की, अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमधील कौशल्ये अधिक विकसित होतील. सांघिक गुण, संशोधनवृत्ती आणि तंत्रज्ञानाचा योग्य वापर करण्याची क्षमता निर्माण होईल. भविष्यातही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांना प्रोत्साहन दिले जाईल.
यावेळी कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ. लितेश मालदे, डिन अकॅडेमिक्स प्रा. भगतसिंग जितकर, संगणक विज्ञान विभागप्रमुख डॉ. राधिका धणाल, डेटा सायन्स विभागप्रमुख डॉ. गणेश पाटील, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग विभागप्रमुख डॉ. सिद्धेश्वर पाटील, डिन सीडीसीआर प्रा. सुदर्शन सुतार, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. मकरंद काईंगडे, विभागीय इंटर्नशिप समन्वयक यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग’ हा यशाचा खात्रीशीर मार्ग : प्रा. रामकुमार राजेंद्रन
RELATED ARTICLES
Mumbai
clear sky
25.2
°
C
25.2
°
25.2
°
62 %
5.2kmh
0 %
Sun
25
°
Mon
27
°
Tue
27
°
Wed
26
°
Thu
26
°

